'लेक माझी दुर्गा' या नव्या मालिकेच्या प्रोमोवरुन हेमांगी पुन्हा ट्रोल

मालिकेच्या निमित्तानं 'ईसकाळ'शी मनमोकळा संवाद साधताना अभिनेत्रीने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं.
Hemangi Kavi
Hemangi KaviGoogle

मराठीतील कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हणून आजकाल हेमांगी कवीचं(Hemangi Kavi) नाव प्रामुख्यानं घेेतलं जातं. सोशल मीडियावर तिनं पोस्ट टाकली रे टाकली त्याची चर्चा झालीच पाहिजे किंवा त्यावरनं नवा वाद उठलाच पाहिजे. आता हो अगदी तिचं वक्तव्य हे कंगनाइतकं बेताल कधीच नसतं. तिची 'बाई,ब्रा आणि बूब' ही पोस्ट असो की अगदी आताचीच लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीच्या वेळेस मराठी कलाकार गैरहजर .यावर तिनं मतप्रदर्शन केलेली पोस्ट असो...तिच्या विचारांतून तिचा बंडखोरपणा वारंवार दिसून आला आहे. हेमांगीन तिची आगामी मालिका 'लेक माझी दुर्गा' या कल्रर्स मराठी वाहिनीवरील मालिकेच्या निमित्तानं ईसकाळाला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळा संवाद साधला आहे.. तिच्या या मालिकेचा प्रोमो सध्या चर्चेत आहे.

Hemangi Kavi
ट्रोलरच्या अश्लील प्रश्नावर 'तारक मेहता..' च्या बबिताची शिवीगाळ

या प्रोमोवरुन तरी दिसतंय की मालिका स्त्रीप्रधान असणार पण प्रोमोवरनं हे कळत नाहीय की स्त्रियासंदर्भातल्या नेमक्या कोणत्या मुद्द्यावर भाष्य करण्यात येणार आहे. मालकेविषयी बोलतना हेमांगी म्हणाली,''मी जशी बंडखोर आहे. अन्यायाविरुद्ध लढा देणारी आहे अगदी तसाच 'लेक माझी दुर्गा' या मालिकेतील माझ्या भूमिकेचा ग्राफ आहे. पण नेमकं काय दाखवलं जाणार आहे याचा अंदाज लोकांना लागत नाही आहे ते चांगलंच आहे. कारण त्यामुळेच त्यातील गूढ जाणून घेण्यासाठी लोकं मालिका आवर्जून पाहतील. सोशल मीडियावर तिच्या या मालिकेच्या प्रोमोवर काही प्रतिक्रियांमध्ये म्हटलंय की,''आता छोट्या पडद्यावरही कॉन्ट्रोवर्सी पहायला मिळणार का''.यावर मात्र तिनं पलटवार करताना ट्रोलर्सना चांगलंच खडसावलंय.

Hemangi Kavi
हॉट अमृताच्या 'विंटेज लूक' वर भाळले चाहते...फोटोंची होतेय चर्चा

ती म्हणाली,''लोकांना वाटत आहे मी पब्लिसिटी मिळवण्यासाठी पोस्ट करत आहे. पण तसं मुळीच नाही. मी जे काही हे बंडखोर विचार बोलत आहे त्याचं बाळकडू मला माझ्या घरातून माझी आई-ताईकडून मिळालं आहे. आता मला फक्त सोशल मीडिया हे माध्यम मिळालं त्यामुळे मी लोकांपर्यंत पोहचू शकले. माझे विचार मांडू शकले. त्यामुळे मी पूर्वीपासून माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून तशीच बंडखोर प्रवृत्तीची आहे. लोकं म्हणतात,तुला राखी सावंत,किरण माने व्हायचंय. पण असं बोलणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या दूषित विचारांना देव जरी आला तरी संपवू शकत नाही. मी अनेकदा दुर्लक्ष करते पण एका क्षणी मलाही माहिती आहे की या आवाजांना कसं थांबवायचं ते. तिने एका सिनेमातील संवादाचा संदर्भ देत म्हटलं,'जो काम नही खराब कर सकते,वह नाम खराब करने में लग जाते है'. माझ्या अभिनयावर टीका करणाऱ्यांचे मी नक्कीच ऐकेन पण जे माझ्या व्यक्त होण्यावर बोट ठेवतील त्यांना गप्प करायला मी मागेपुढे पहाणार नाही. तिथे माझी बंडखोरी दिसणारंच. 'लेक माझी दुर्गा' या मालिकेतील आई तिच्या लेकीसाठी समाजाशी लढा देणारी आहे जी बहुतांशी माझ्यासारखीच आहे त्यामुळे आपण मालिकेविषयी,त्यातील भूमिकेविषयी खूप उत्सुक असल्याचं हेमांगीनं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com