
हेमांगी कवी म्हणाली : जमलं तर माफ करा बाबासाहेब...
Entertainment News : हेमांगी कवी हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट, नाटक तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. विशेष म्हणजे अभिव्यक्तीच्या आधारावर अत्यंत परखडपणे आपले पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहचवत असते. त्यामुळे ती कायमच सोशल मीडियावर आपल्याला सक्रिय दिसते. सध्या तिने एक फेसबुक पोस्ट केली असून त्यामध्ये तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना नेमकी तिने माफी का मागितली याचे कारणही तितकेच परखड आहे.
हेही वाचा: Ranbir Alia Wedding: सासू म्हणतेय सुनबाई गोड आहे, तर नणंद म्हणतेय..
हेमांगी (hemangi kavi) नेहमी व्हिडीओ, रिल्स करण्याला प्राधान्य देते पण हल्ली ती फेसबुक द्वारेही आपले विचार लिहून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पेट्रोल दरवाढीवर भाष्य केले होते. पेट्रोलने जवळपास १२० रुपयांचा टप्पा गाठल्याने सामान्यांच्या खिशाला कातर लागली आहे. चाकरमानी अक्षरशः हैराण झाले आहेत. म्हणून तिने 'ह्या petrol दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला, पण आता लिंबू वर petrol फिरवणार आहे.' अशी पोस्ट केली होती. आता तिने अत्यंत गंभीर विषयाला हात घातला आहे.
हेही वाचा: Ranbir Alia wedding : नीतू कपूरने दिली गुड न्यूज; लग्न आजच..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी आयुष्य वेचले. स्वतः शिकून समाज शिक्षित करण्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला, दलितांचेच नव्हे तर एकूणच मानव जातीने 'माणूस' म्हणून वागावं यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांनी लिहिलेल्या संविधानावर आज देश चालतो आहे. याच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. जगभरातून आज बाबासाहेबांना अभिवादन केले जाते आहे. मनोरंजन विश्वातूनही अनेकांनी आज 'जय भीम' चा नारा दिला. हेमांगी कवीने मात्र काहीशा वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. (hemangi kavi new post on dr. babasaheb ambedkar)
'मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!' अशी पोस्ट हेमांगीने केली आहे. अत्यंत ज्वलंत आणि डोळे उघडणारी ही पोस्ट आहे. आज संविधानाने दिलेला एकात्मतेचा संदेश बाजूला सारून आपण मनमानी करत आहोत. केवळ स्वतःची पोळी भाजायला अनेकजण महान पुरुषांची नावे घेतात. अशा सर्वांनाच ही एक चपराक आहे.
या पोस्टवर अनेकांनी कमेंट केलेल्या असून काहींनी हेमांगीशी वाद देखील घातला आहे. पण हेमांगीने मात्र सगळ्यांना संयमाने उत्तर दिले आहे. अनेकांनी तिच्या विचारांचे कौतुक केले आहे. बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी हेमांगीची पोस्ट महत्वाची आहे असे अनेक चाहत्यांनी म्हंटले आहे.
Web Title: Hemangi Kavi Post On Babasaheb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..