
Ranbir Alia wedding : नीतू कपूरने दिली गुड न्यूज; लग्न आजच..
रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांचे लग्न कधी होणार याकडे लाखो चाहत्यांचे लक्ष लागले होते. हा एखादा जागतिक सोहळा असावा अशी त्यांच्या लग्नाची चर्चा झाली आहे. हे लग्न एप्रिल मध्ये होणार या अंदाजापासून ते १५ ला होणार, १६ ला होणार, १७ ला होणार असे अनेक अंदाज चाहत्यांनी बांधले. याबाबत कोणीतही अधिकृत माहिती कुटुंबीयांनी दिली नव्हती. कपूर आणि भट परिवाराला तारीख सांगण्यावरून अक्षरशः भंडावून सोडले. अखेर रणबीर कपूरची आई नीतू कपूर हिने लग्नाबाबत खुलासा केला आहे. (Ranbir Alia Wedding)
हेही वाचा: Ranbir Alia wedding : कर्मचाऱ्यांच्या फोनवर स्टिकर; फोटो लीक...
गेल्या दोन दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. राहत्या घरी, चेंबूर येथील आर के स्टिडिओ, (r k studio) वांद्रे येथील 'वास्तू' बंगला, आलियाचे घर इथे रोषणाई, सजावट, खानपान यांची जय्यत व्यवस्था करण्यात आली आहे. या लग्नात सुरक्षिततेचीही तितकीच काळजी घेतली जात आहे. लग्नाची पूर्वतयारी साठी आता अनेक कामगार, कर्मचारी, सुरक्षारक्षक येऊ लागले आहेत. तर पाहुण्यांची ये-जा ही वाढली आहे. माध्यमांना मात्र का सोहळ्यापासून पूर्ण लांब ठेव अंतिम टप्प्यात आली असून कोणत्याही क्षणी हे लग्न लागू शकते. पण नेमके कधी याची माहिती स्वतः नीतू कपूर (neetu kapoor) माध्यमांशी बोलल्या.
हेही वाचा: Photo : रणबीर आलियाचे काही खास क्षण... : Ranbir Alia widding
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर आणि आलीया यांच्या विवाह सोहळ्याला कालपासून सुरवात झाली. बुधवारी सकाळी ११ वाजता रणबीर आणि आलियाचा लग्नाआधीचा गणेशपूजन विधी पार पडला. या सोहळ्याला केवळ घरातील काही मंडळी उपस्थिती होती. दुपारी २ नंतर मेहंदीचा कार्यक्रम सुरु झाला. (ranbir alia mehendi) दिवसभर पाहुण्यांची रीघ सुरूच होती. हि सर्व गडबड आटपून रात्री घरी परतताना रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांना माध्यमांनी अडवलं.
हेही वाचा: Ranbir Alia wedding : अखेर रणबीर आलियाचे गणेश पूजन, मेहंदी पार पडली..
गेले काही दिवस त्यांना एकच प्रश्न विचारला जात होता. रणबीरचे लग्न कधी आहे. परंतु त्यांनी कधीही उत्तर दिले नाही. काल मात्र त्यांनी या प्रश्नाला उत्तर दिले आहे. रणबीर आणि आलियाचे लग्न आज, गुरुवारी १४ एप्रिल रोजी होणार असल्याची आनंदवार्ता त्यांनी दिली. हे लग्न वांद्रे येथील 'वास्तू' या रणबीर कपूर च्या निवासस्थानी होणार असल्याचेही त्या म्हणाल्या. (ranbir alia wedding today at vaastu) या बातमीने अनेकांना मोठा आनंद झाला आहे. गेली काही दिवस ज्याची चर्चा होती, तो विवाह अखेर आज होत आहे. या विवाह सोहळ्याला घरच्या पाहुण्यांसह रणबीर आणि आलियाचे मित्र मैत्रिणी, बॉलीवूडमधील काही कलाकार हजेरी लावणार आहेत.
Web Title: Ranbir Alia Wedding
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..