Hemant Dhome: "शिकारी बाबूच्या गळ्यातला दात"; आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

Hemant Dhome: संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर आता अभिनेते हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) ट्वीट केलं आहे. हेमंतच्या या ट्वीट अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Hemant Dhome, Sanjay Gaikwad
Hemant Dhome, Sanjay Gaikwadesakal

Hemant Dhome: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वाघाच्या शिकारीचं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. संजय गायकवाड यांना गळ्यातील लॉकेटबाबत विचारण्यात आले होते. तेव्हा ते म्हणाले होते, "हा दात वाघाचा आहे. मी स्वत: 1987 मध्ये वाघाची शिकार केली होती." त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अभिनेते हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) ट्वीट केलं आहे. हेमंतच्या या ट्वीट अनेकांचे लक्ष वेधले आहे.

हेमंतचे ट्वीट

"या शिकारी बाबूच्या गळ्यातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती आणि असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय! लक्ष द्या" या ट्वीटमध्ये हेमंतनं भूपेंद्र यादव आणि सुधीर मुनगंटीवार यांना टॅग देखील केलं आहे.

वन विभागाने लॉकेट घेतलं ताब्यात

संजय गायकवाड यांनी दावा केला होता की, त्यांनी वाघाची शिकार केली आणि त्यांच्या गळ्यातील लॉकेटमध्ये वाघाचा दात आहे. त्यांच्या या दाव्यानंतर वन विभागाने ते लॉकेट आपल्या ताब्यात घेतली असून ती डेहराडून येथील वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे देखील वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेमंत ढोमेचे चित्रपट

अभिनेता हेमंत ढोमे हा विविध विषयांवरील त्याची मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. सोशल मीडियावरील हेमंतच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. हेमंत त्याच्या चित्रपटांमुळे देखील चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा झिम्मा-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चोरीचा मामला, पोस्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटांमध्ये हेमंतनं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com