Hirva Trivedi: 'भोला'मध्ये असेलली अजयची मुलगी कोण माहितीये का ? अवघ्या ९व्या वर्षी लोकप्रियतेच्या शिखरावर

Hirva Trivedi in Bholaa movie
Hirva Trivedi in Bholaa movieEsakal

अभिनेता अजय देवगणचा भोला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाल केली नसली तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

भोला चित्रपटातील अजय देवगणच्या अ‍ॅक्शनसोबतच इतर कलाकारांच्या अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. त्यातीलच एक म्हणजे चित्रपटात भोलाच्या मुलीची भुमिका साकारणारी बाल अभिनेत्री हिरवा त्रिवेदी.

Hirva Trivedi in Bholaa movie
Urfi Javed: उर्फीताई सुधारणार नाहीच.. उर्फीचं माफी मागण्याचं खरं कारण ऐकून तुम्ही डोक्यावर हात माराल

या चित्रपटात हिरवा त्रिवेदीचं नाव ज्योती आहे. हिरवा त्रिवेदीने या चित्रपटात ज्योतीची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली आहे. तिच्या या भुमिकेची सर्वचजण प्रशंसा करत आहेत. त्याचबरोबर हिरवा ही कोणं आहे. तसचं ती यापुर्वी कोणत्या चित्रपटात दिसली असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना उत्सूकता होती. तर जाणुन घेवुया हिरवा त्रिवेदी आहे तरी कोण?

Hirva Trivedi in Bholaa movie
Karan Johar Troll: करणला 'सीमा आंटी' का म्हणू लागलेयत लोक?, स्वतः खुलासा करत म्हणाला...

हिरवा त्रिवेदी हिचा जन्म 18 एप्रिल 2014 रोजी गुजरातमधील राजकोट येथे झाला. गुजराती कुटुंबातील 9 वर्षीय हिरवाने भोला चित्रपटापूर्वी टीव्ही शो आणि वेब सीरिजमध्येही काम केले आहे.

2019 मध्ये ती पहिल्यांदा एका प्रिंटर कंपनीच्या जाहिरातीत दिसली होती. 2019 मध्ये तिने हेल्दी बेबी स्पर्धेत तिच्या सुंदर डोळ्यांसाठी पुरस्कार जिंकला आहे.

Hirva Trivedi in Bholaa movie
Box Office Collection: साउथच्या 'दसरा' पुढे अजयचा 'भोला' टिकेना! काय सांगतायत बॉक्स ऑफिसचे आकडे...

यानंतर हिरवा त्रिवेदी 2020 मध्ये स्टार प्लसच्या 'गुम है किसी के प्यार' में शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने हरणी देशपांडेची भूमिका साकारली होती.

2021 मध्ये, हिरवा त्रिवेदी सब टीव्हीच्या शुभ-लाभ: आपके घर में आणि झी टीव्हीच्या काशीबाई बाजीराव बल्लालमध्ये दिसली होती. 2022 मध्ये तिने एमएक्स प्लेयरच्या आंटी या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

अजय देवगणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हिरवा त्रिवेदीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांने प्रतिभेचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com