
देसी गर्ल प्रियंकाच्या अमेरिकनं सासरी अशी रंगली भारतीय होळी
बॉलीवूड(Bollywood)च नाही तर आता हॉलीवूड(Hollywood) मध्येही आपलं नाव कमावलेली प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) सध्या आपला पती निक जोनस(Nick Jonas) सोबत अमेरिकेत सुखानं संसार करतेय. प्रियंका अमेरिकेत राहत असली तरी ती अनेकदा भारतीय परंपरा-संस्कृती जपताना दिसते. यंदा तिनं निक आणि आपल्या कुटुंबासोबत धम्माल-मस्ती करत लॉस एंजेलिस येथील आपल्या नवीन घरात रंगांचा हा खेळ धमाल-मस्ती करत साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये प्रियंका आणि निकचा होळी खेळतानाचा रोमॅंटिक मूडही भलताच चाहत्यांना आवडला आहे.
प्रियंका चोप्रा च्या नवीन घरातील होळी सेलिब्रेशनमध्ये अख्खं जोनस कुंटुंब सामिल झालं आहे. या फोटोंना-व्हिडीओला पाहून प्रियंकानं आपल्या सासरच्या अमेरिकन मंडळींनाही भारतीय संस्कारांची-परंपरेची आवड चांगलीच लावली हे प्रकर्षांन दिसून येत आहे. प्रियंका चोप्रानं होळीच्या सणाला पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. त्यावर तिनं ट्रेडिशनल ज्वेलरी परिधान केली आहे. तर निकन प्रिंटेड शॉर्ट्स आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. पण ते दोघंही रंगानं इतके माखले आहेत की त्यांच्या कपड्यांचा पांढरा रंग कलरफुल झालेला दिसत आहे. प्रियंका कधी निक सोबत रोमॅंटिक अंदाजात दिसली तर कधी स्विमिंग पूलच्या किनारी रंगात माखलेली प्रियंका रिलॅक्स होताना दिसली.
खरं तर हे वर्ष निक-प्रियंका दोघांसाठी खूप खास आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सरोगसीच्या माध्यमातनं ते आई-बाबा झाले आहेत. अद्याप त्यांनी मुलीचे फोटो दाखवले नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावर आई-बाबा झाल्याचा आनंद मात्र ओसंडून वाहतोय. या बातमीनंतर प्रियंका आणि निकमध्ये काहीतरी बिनसलं आहे या अफवेला देखील पूर्णविराम मिळाला आहे.
Web Title: Holi 2022 When Nick Jonas Celebrated His First Festival Of Colours With Priyanka Chopra In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..