प्रेयसीला 'गुलाबी' आणि बायकोला 'लाल' गुलाब.., होळीला कुशलनं सांगितला रंगातला महत्त्वाचा फरक Holi 2023 Kushal Badrike Post | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kushal Badrike Post

Holi 2023: प्रेयसीला 'गुलाबी' आणि बायकोला 'लाल' गुलाब.., होळीला कुशलनं सांगितला रंगातला महत्त्वाचा फरक

Kushal Badrike Post: 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शो मुळे कुशल बद्रिके हे नाव घराघरात पोहोचलं. डोंबिवलीचा कुशल आज महाराष्ट्रातील घराघरात प्रसिद्ध आहे. विनोदी भूमिकाच नाहीत तर 'एक होता काऊ' सारख्या सिनेमातून कुशलनं आपल्या अभिनयाची दुसरी बाजू ही लोकांसमोर आणली आहे.

सोशल मीडियावरही कुशल बद्रिके भलताच सक्रिय असलेला पहायला मिळतो. तो नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि आपल्या प्रोफेशनल लाईफ विषयी वेगवेगळ्या पोस्ट करताना दिसतो.(Holi 2023 Kushal Badrike Post)

कुशलनं गेल्या काही दिवसांत केलेल्या अर्थपूर्ण पोस्ट सोशल मीडियावर खूपच चर्चेत आल्या आहेत. आता देखील होळी,धुळवडी निमित्तानं त्यानं एक पोस्ट करत रंगांचं सुरेख महत्त्व पटवून दिलं आहे.

कुशलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,''आपल्याला एखाद्या व्यक्ती विषयी नेमकं काय वाटतं, हे सांगताना शब्द कमी पडले की मदतीला “रंग” धावून येतात. म्हणून तर प्रेयसीला आपण “गुलाबी” गुलाब देतो 💐आणि बायकोला “लाल”.🌹रक्ताचं नातं उगाच का म्हणतात तिला!! आता काही माणसं बायकोला गुलाब, देत सुद्धा नाहीत, लग्नानंतर ज्यांच्या आयुष्यातला “रंगच” उडालाय त्यांच्याविषयी आपण काय बोलणार.''

पण या रंगीबेरंगी दुनियेत “अंतरंग” ओळखणारी माणसं सोबतीला असली ना, की आयुष्य रंगीत होऊन जातं आणि जगण्याचा उत्सव होतो.
आपल्या रंगोत्सवाचे रूपांतर जीवनोत्सवात होऊन जाऊ देत .
“Happy Holi “ :- सुकून

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

कुशल बद्रिकेला आपण नुकतंच 'पांडू' सिनेमात पाहिलं. भाऊ कदमच्या सोबतीनं त्यानं सिनेमात धमाल केली होती. 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर तर तो आपल्या स्किटमधनं रंगत आणतच असतो पण येणाऱ्या वर्षात त्याचे काही सिनेमेही पाइपलाइनमध्ये आहेत.