ती काहीही सांगेल म्हणजे खरं समजायचं का? 'जॅक स्पॅरो' भडकला|Hollywood Actor Johny Depp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Johny Depp

ती काहीही सांगेल म्हणजे खरं समजायचं का? 'जॅक स्पॅरो' भडकला

Hollywood News: हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी ड़ेप (Johny Depp) हा चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याच्या पहिल्या बायकोनं त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे जॉनी डेपवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. त्याला (Social media Viral news) गेल्या काही दिवसांपासून ट्रोलही करण्यात आले आहे. यासगळ्या परिस्थितीवर जॉनीनं आपली प्रतिक्रियाही दिली आहे. आपली पूर्व पत्नी काहीही म्हणेल याचा अर्थ तिचे सगळे बरोबर आहे असे नाही. अशा शब्दांत त्यानं (entertainment news) तिच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता जॉनीनं देखील त्याची पूर्व पत्नी एंबर हर्डच्या विरोधात कायदेशीर तक्रार केली आहे. तिच्याविरोधात 50 मिलियन डॉलरची मानहानीता दावाही ठोकला आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून जॉनी डेप आणि त्याची एक्स वाईफ यांच्यात वाद सुरु झाला आहे. त्यावरुन त्या दोघांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तो वाद आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी एवढे मोठे कलाकार मात्र तुमच्या घरातील वाद हे तुम्हाला तुमच्या पातळीवर सोडवण्याची विनंती केली आहे. जॉनीनं आपल्यावर जे लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले ते खोटे आहेत. ते तिनं कुणाच्या तरी सांगण्यावरुन केले आहेत. एंबर हर्ड असे तिचे नाव आहे. तिनं जॉनीवर कौटूंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहेत. हल्ली अनेकजण पैशांच्या हव्यासापोटी अशाप्रकारचे आरोप करत असल्याचे जॉनीनं म्हटले आहे.

हेही वाचा: IPL 2022: स्टोइनिस क्लीन बोल्ड झाल्यामुळे संतापला, थेट घातल्या शिव्या... Video Viral

दुसरीकडे त्याच्या पहिल्या पत्नीनं देखील जॉनीच्या त्या आरोपांना जशास तसे उत्तर दिले आहे. तिनं जॉ़नी आपल्याशी पहिल्यापासून खोटं बोलत असल्याचे म्हटले आहे. त्यानं आपल्या अनेकदा शाररिक आणि मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे. एका इंग्रजी मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हर्डनं केलेल्या कृत्याचा पाढा तिनं वाचला आहे. भलेही जॉनीची लोकप्रियता जगभरात असो मात्र तो घरात एक माणून म्हणून कसा होता याचीही कल्पना लोकांना होणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्याच्याविरोधात आक्रमक पाऊल उचलल्याचं तिनं सांगितलं आहे.

हेही वाचा: Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

Web Title: Hollywood Actor Johny Depp Ex Wife Domestic Violence Allegations Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top