अंथरुणावरच शौच करण्याची होती सवय, अभिनेत्याचा बायकोबाबत धक्कादायक खुलासा|Hollywood News Johny Depp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

John Depp News

अंथरुणावरच शौच करण्याची होती सवय, अभिनेत्याचा बायकोबाबत धक्कादायक खुलासा

Hollywood News: नवरा बायकोची भांडणं कशावरुन होतील हे काही सांगता येत नाही. त्याला कशाचंही निमित्तं पुरतं. तो वाद थोडक्यात सुटला तर बरं नाहीतर कोर्ट कचेऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे त्याचे वाद सुरुच आहेत. हॉलीवूडमधील असाच एक (Social Media Viral news) वाद गेल्या काही वर्षांपासून सुरु असून त्यातील काही गंमतीशीर मात्र तितक्याच धक्कादायक गोष्टी आता समोर आल्या आहेत. पायरेट्स ऑफ कॅरेबियन या चित्रपटानं साऱ्या जगाला वेड लावलं. त्यातील जॅक (Pirates Of Carribeian) स्पॅरोची भूमिका साकारणाऱ्या जॉनी डेप या कलाकाराच्या (Jack Sparrow) मागे साडेसाती सुरु आहे की काय अशी परिस्थिती आहे. त्याच्या पत्नीनं जॉनीवर नको ते आरोप केले उलटपक्षी जॉनीनं देखील आपल्या पहिल्या पत्नीबाबत नको ते खुलासे करुन वेगळीच चर्चा जगासमोर आणली आहे.

जॉनीच्या पहिल्या पत्नीनं एंबर हर्डनं त्याच्यावर लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना जॉनीनं हे सर्व ती लोकप्रियता मिळवण्यासाठी करत असल्याचे म्हटले होते. तिनं आपल्यावर जे काही आरोप केले आहेत त्यात काही तथ्य नसल्याचे म्हटले असून जॉनीनं तिच्यावरही नको ते आरोप करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या हॉलीवूडमध्ये जॉनी डेप आणि त्याची पहिली पत्नी एंबर हर्ड यांचे प्रकरण साऱ्या हॉलीवूडमध्ये चर्चेचे बनले आहे. त्यामुळे त्याविषयी अनेक सेलिब्रेटींना कमालीचे कुतूहलही आहे. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्नही त्यांना पडला आहे.

हेही वाचा: PHOTO VIRAL: आता काय बोलायचं, ह्रतिकनं सांभाळली प्रिती झिंटाची मुलं!

2016 मध्ये त्यांच्यात वादाला सुरुवात झाली. ती अद्याप सुरु आहे. आता जॉनीनं एक भयानक आरोप एंबरवर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, एंबरला अंथरुणावर शौच करण्याची सवय होती. त्यामुळे मी त्रस्त झालो होतो. आता ही बातमी साऱ्या हॉलीवूडभर त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. जॉनी डेप हा हॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकार आहे. त्याच्याबाबत अशाप्रकारची बातमी अपेक्षित नव्हती. याप्रकारच्या कमेंटसही व्हायरल होताना दिसत आहे. 2018 मध्ये जॉनीच्या एक्स वाईफनं 50 मिलियनसाठी कोर्टात दावा ठोकला होता.

Web Title: Hollywood News Johny Depp Ex Wife Amber Heard Court Trial Defamation News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top