पाचवेळा ग्रॅमी मिळवणाऱ्या नाओमी जुड काळाच्या पडद्याआड |Hollywood Singer 5 Times Grammy Awards winner Naomi Judd | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naomi Judd

पाचवेळा ग्रॅमी मिळवणाऱ्या नाओमी जुड काळाच्या पडद्याआड

Naomi Judd Passed Away: हॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनत्री नाओमी जुड (Naomi Judd Death) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे. त्या गेल्या काही वर्षांपासून एका मानसिक आजारानं त्रस्त होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच हॉलीवूडवर शोककळा (Hollywood News) पसरली आहे. आतापर्यत मोठमोठ्या सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या सुंदर आवाजानं जगभरातील श्रोत्यांना सुरानंद देणाऱ्या गायिका म्हणून त्यांची ओळख होती. आपल्या आवाजानं त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. पाचवेळा ग्रॅमी पुरस्कार नावावर करणाऱ्या गायिका म्हणूनही त्यांची ओळख होती. अद्याप त्यांच्या मृत्युचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्या नातीनं त्या गेल्या काही वर्षांपासून एका मानसिक आजारानं त्रस्त होत्या. असं सांगितलं आहे.

नॅशविले या संगीत सोहळ्यामध्ये सहभागी होण्यापूर्वीच जुड यांचे निधन झाले आहे. त्या कार्यक्रमामध्ये म्युझिक हॉलच्या एका उद्घघाटनला त्या हजर राहणार होत्या. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना मोठा धक्का बसला आहे. जुड या आंतरराष्ट्रीय संगीत क्षेत्रातील मोठ्या मान्यवर म्हणून प्रसिद्ध होत्या. ज्या हॉल ऑफ फेमचं त्यांच्या हस्ते उद्धघाटन होणार होते तो सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा: Video : कामगार दिनाचा निषेध दिन म्हणून पिंपरीमधील दुचाकी रॅली पोलिसांनी अडवली

जुडस यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या फेयरवेल टूरची घोषणाही केली होती. त्याला त्यांच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी 30 सप्टेंबरपासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली होती. त्या दौऱ्याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी यांनी सांगितलं की, मला आजवर माझ्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं आहे. त्यामुळे मी फार भारावून गेले आहे. गेल्या 38 वर्षांपासूनच्या या प्रवासात मला अनेकांचे सहकार्य मिळाले. मी त्यांची सदैव ऋणी राहिल असे त्यांनी म्हटले होते.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: Hollywood Singer 5 Times Grammy Awards Winner Naomi Judd Passed Away

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top