Vikram Vedha: हृतिक-सैफच्या मानधनात मोठी तफावत; एकानं घेतले 50 करोड तर दुसऱ्यानं... Hrithik Roshan, Saif Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan and Saif Ali khan fees for Vikram Vedha, Read Details

Vikram Vedha: हृतिक-सैफच्या मानधनात मोठी तफावत; एकानं घेतले 50 करोड तर दुसऱ्यानं...

Vikram Vedha: हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनित विक्रम वेधाची रिलिज डेट जवळ येतेय. येत्या ३० सप्टेंबरला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय. चाहते या सिनेमाची चातकासारखी वाट पाहतायत. सिनेमाच्या ट्रेलरनं याआधीच सोशल मीडियावर धूम ठोकली आहे. रिलीज आधीच अनेक कारणांनी देखील सिनेमा चर्चेत आहे. हृतिक आणि सैफ एकत्र सिनेमाचं प्रमोशन करताना दिसले नाहीत म्हणून दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा याआधीच रंगली आहे. एवढं सगळं सुरु असताना आता दोघांच्या मानधनाचा आकडा समोर आला आणि नव्या चर्चेला उधाण आलं. (Hrithik Roshan and Saif Ali khan fees for Vikram Vedha, Read Details)

हेही वाचा: Vikram Vedha: 'सिनेमा चालेल की नाही...', स्वतःच्याच सिनेमाविषयी हृतिकचं शॉकिंग विधान

सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्यातील हृतिकच्या खलनायकी लूकला खूप पसंत केलं गेलं. तर सैफने पोलिस अधिकाऱ्याच्या लूकमध्ये आपल्या चाहत्यांचं मन जिंकलं. एवढंच नाही तर सिनेमातील गाण्यांची जादूही काम करून गेली आहे. पण तुम्हाला माहित आहे का मेकर्सनी या सिनेमासाठी अभिनेत्यांना मोठी किंमत मोजलेली आहे, पण त्यातही मोठी तफावत पहायला मिळतेय दोघांच्या मानधनात.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: 'सरकार पडणार, मला आधीच कुणकुण होती..; मांजरेकर स्पष्टच बोलले

हृतिक गेल्या वीस-बावीस वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीचा भाग आहे,त्यानं अनेक सिनेमांतून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. २०१९ साली आलेल्या त्याच्या 'वॉर' सिनेमानंतर हृतिक रोशन तब्बल ३ वर्षांनी मोठ्या पडद्यावर चाहत्यांना दिसणार आहे. 'विक्रम वेधा' सिनेमात हृतिक खलनायकाच्या भूमिकेत आहे. बोललं जात आहे की सिनेातील इतर कलाकारांपेक्षा हृतिकला मेकर्सनी तगडं मानधन दिलं आहे. हृतिकनं ५० करोड रुपये सिनेमासाठी चार्ज केले होते.

हेही वाचा: Big Boss Marathi 4: मांजरेकरांना बिग बॉसच्या घरात हवेयत संजय राऊत, म्हणाले...

'विक्रम वेधा'त हृतिक एवढाच सीनियर किंबहुना ३-४ वर्ष जरा जास्तच त्याला सीनियर असलेला सैफ अली खान पोलिस अधिकारी बनला आहे. सैफ नेहमीप्रमाणेच डॅशिंग दिसत आहे. चाहत्यांनी त्याला पसंतीही दर्शवली आहे. सिनेमात हृतिक आणि सैफ एकमेकांसमोर दुश्मन बनून उभे ठाकणार आहेत. हृतिकच्याच तागदीचा रोल सैफचा असूनही त्याला मात्र मेकर्सनी फक्त १२ करोड रुपयांवर समाधान मानायला लावल्याचं बोललं जात आहे. तर तिकडे सिनेमातील अभिनेत्री राधिका आपटेविषयी कळत आहे की तीनं ३ करोड रुपये सिनेमातील भूमिकेसाठी आकारले होते. राधिकानं सिनेमात सैफ अली खानच्या पत्नीची भूमिका केली आहे,जी व्यवसायानं वकील दाखवली आहे.