'ब्रह्मास्त्र 2' साठी हृतिकला ऑफर; पण अभिनेता प्रेमानं नकार कळवत म्हणाला... Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan Say, 'No' to Brahmastra 2, this is the reason to know..

'ब्रह्मास्त्र 2' साठी हृतिकला ऑफर; पण अभिनेता प्रेमानं नकार कळवत म्हणाला...

Hrithik Roshan: हॉलीवूड सिनेमांसारखेच आता बॉलीवूडमध्येही सिनेमांच्या सीक्वेलचे वारे वाहू लागलेयत. रोहित शेट्टीनं खरंतर हा ट्रेन्ड सुरू केला,आता याच तयारीत 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी देखील आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' लवकर रिलीजच्या वाटेवर आहे, रणबीर कपूर,आलिया भट्ट(Alia Bhatt),नागार्जुन,अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड बिझी आहेत. अमिताभ प्रकृतीमुळे उपस्थित राहू शकत नसले तरी सोशल मीडियाच्या,त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून ते प्रमोशन करताना दिसत आहेत. आता या दरम्यान बातमी आहे की 'ब्रह्मास्त्र २: देव' साठी हृतिक रोशनला ऑफर दिली गेली होती पण त्यानं चक्क सिनेमाला रीजेक्ट केलं आहे.(Hrithik Roshan Say, 'No' to Brahmastra 2, this is the reason to know..)

हेही वाचा: 'ब्रह्मास्त्र'वर अग्निहोत्रींचे टीकास्त्र; करण,अयानची खिल्ली उडवत म्हणाले...

काही मीडियाच्या रीपोर्ट्सनुसार समोर आलं होतं की,'ब्रह्मास्त्र २' मध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहे,पण त्याने सिनेमाच्या मेकर्सना आपला नकार कळवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हृतिक पहिल्यापासून 'क्रिश ४' आणि 'रामायण' अशा 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या धाटणीच्याच कलाकृतीचा भाग आहे. त्यामुळे त्याला वाटत आहे की, 'ब्रह्मास्त्र २' केला तर पुन्हा त्याला त्याचा खूप वेळ आणखी एका मोठ्या व्हीएफएक्स सिनेमासाठी द्यावा लागेल. आणि सध्या तो जेवढे सिनेमे करता येतील तेवढे करण्याच्या विचारात आहे. पुढील ७-८ वर्षात केवळ आपले ३ सिनेमे रिलीज व्हावेत या विचाराशी तो सहमत नाहीय. हृतिकने अयान आणि करणला याविषयी आपलं मत सांगत खूप प्रेमानं नकार कळवल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा: सोहेल खानच्या एक्स-वाईफचे शॉकिंग विधान; म्हणाली,'मला स्त्रिया आवडतात म्हणूनच..'

'ब्रह्मास्त्र' सिनेमा हा ३ भागात बनणार आहे. एका इंग्रजी वेबसाईटनं यासंदर्भात दावा केला होता की, या सिनेमाचा दुसरा भाग महादेव आणि पार्वतीवर आधारित असेल. 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या भागात रणबीर आणि आलिया मुख्य भूमिकेत आहेत. जे शिवा आणि ईशाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. शिवा हे महादेवाचं आणि ईशा हे पार्वतीचेच नाव आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार,सिनेमातील सर्व व्यक्तीरेखा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या सिनेमात असं दाखवलं गेलं आहे जे याआधी कदाचित पाहिलं नसेल.

हेही वाचा: सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

हृतिक रोशनविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'फायटर' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पदूकोण आहे. हा सिनेमा भारतातला पहिला एरियल अॅक्शन सिनेमा असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे. हृतिकने याआधी 'बॅंग,बॅंग' आणि 'वॉर' सिनेमातून सिद्धार्थच्या दिग्दर्शनाखाली काम केलं आहे. फायटर व्यतिरिक्त हृतिकचा आगामी 'विक्रम वेधा'ही चर्चेचा विषय सध्या ठरत आहे. यातील हृतिकचा लूक समोर आल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया त्यावर मिळाल्या होत्या. या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे.

Web Title: Hrithik Roshan Say No To Brahmastra 2 This Is The Reason To

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..