वयाने १६ वर्षांनी लहान अभिनेत्रीला हृतिक करतोय डेट? हातात हात घालून दिसले एकत्र | Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan

वयाने १६ वर्षांनी लहान अभिनेत्रीला हृतिक करतोय डेट? हातात हात घालून दिसले एकत्र

अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतील एका रेस्तराँमधून बाहेर पडताना पापाराझींनी त्याचा हा व्हिडीओ काढला. यावेळी हृतिकसोबत असलेल्या एका तरुणीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या तरुणीचा हात पकडून हृतिक रेस्तराँबाहेर निघाला होता. ती कोण आहे आणि हृतिकने तिचा हात का धरला, असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारले आहेत. हृतिकसोबत असलेली ती तरुणी ही सबा आझाद (Saba Azad) असल्याचं म्हटलं जात आहे. सबा आणि हृतिक एकमेकांना डेट करत आहेत का, असाही अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे.

२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुझसे फ्रँडशीप करोगे' या चित्रपटात सबाने मुख्य भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी ती नेटफ्लिक्सच्या 'फिल्स लाइक इश्क' या वेब शोमध्येही झळकली होती. सबा लवकरच 'रॉकेट बॉईज' या सोनी लिव्हच्या सीरिजमध्येही दिसणार आहे.

हेही वाचा: 'बिग बॉस १५' विजेती तेजस्वीला गौहर खानचा टोमणा; म्हणाली..

हृतिकने २००० मध्ये सुझान खानशी लग्न केलं होतं. लग्नाच्या १४ वर्षांनंतर या दोघांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना हिृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान ही अर्सलान गोणीला डेट करत असल्याची चर्चा आहे. अर्सलान हा बिग बॉस फेम अली गोणीचा चुलत भाऊ आहे.

हृतिकच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास २०१९ मध्ये तो 'वॉर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याचे विक्रम वेधा, फायटर हे चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

Web Title: Hrithik Roshan Spotted On Dinner Date With Mystery Woman As They Leave Hand In Hand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top