सुशांतच्या 'दिल बेचारा'ला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद; अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या....

सुशांतच्या 'दिल बेचारा'ला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद; अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या....

मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचाराला सुशांतच्या चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. एका दिवसात असंख्य लोकांनी हा चित्रपट पाहिला असून चित्रपटाने आयएमडीबी रेटिंग्जमध्ये मोठा विक्रम केला आहे. हा चित्रपट पाहताना चाहत्यांनी हुरहूर आणि हळहळ व्यक्त केली तसेच काही चाहत्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. पाणावलेल्या डोळ्यांनी ते सुशांतच्या आठवणींमध्ये रमले. सोशल मीडियावर भावनिक वातावरण तयार झाले. ट्विटरवर पहिल्या स्थानावर #DilBecharaDay हॅशटॅग ट्रेंड होत होता.

बॉलीवुडमधील अनेक कलाकारांनीही या सिनेमाचे कौतुक करत सुशांतची आठवण काढली. सुशांतच्या कामाचे त्यांनी भरभरून कौतुक केले. गेले अनेक दिवस ज्या चित्रपटाची सगळेच आतुरतेने वाट पाहात होते तो मुकेश छाब्रा दिग्दर्शित अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 'दिल बेचारा' हा चित्रपट शुक्रवारी संध्याकाळी साडे सात वाजता डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना हसवता हसवता रडवून गेला. या चित्रपटाची क्रेझ एवढी होतीकी, शुक्रवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर दिल बेचारा या चित्रपटानेच कब्जा केला होता. पहिल्याच दिवशी असंख्य प्रेक्षकांनी हा सिनेमा बघितला. 10 पैकी 10 आयएमडीबी रेटिंग्स (इंटरनेट मुव्ही डेटा बेस) मिळवत या सिनेमाने एक अनोखा विक्रम नोंदवला.

चित्रपटातील 'जन्म कब लेना है और कब मरना है ये तो हम डिसाइड नहीं कर सकते, लेकिन कैसे जीना है ये हम डिसाइड करते हैं।', 'मैं एक फाइटर हूं और मैं बहुत बढ़िया तरीके से लड़ा।' यांसारखे सुशांतचे डायलॉग्ज चित्रपटात ऐकताना चाहते भावुक झाले होते. सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामध्ये एका चाहत्याने लिहिले आहे की हा चित्रपट पाहात असताना माझ्या डोळ्यात पाणी होते. इतका हा चित्रपट सुंदर आहे. दुसऱ्याने लिहिले आहे की सुशांतचा शेवटचा चित्रपट हा आयुष्य कसे जगावे यावर आहे. मी माझ्या भावनांना रोखू शकत नाही. एक चाहता म्हणतो या चित्रपटाने मला हसविले आणि रडविलेही. हा चित्रपट पाहण्यास सुशांत आपल्यात नाही हे पचविणे खूप कठीण आहे, असेही एका चाहत्याने म्हटले. 

कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

  • अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर दिल बेचाराचा फोटो टाकत लिहिले, पवित्र रिश्तापासून दिल बेचारापर्यंत.
  •  रिया चक्रवर्तीने लिहिले, तू आमच्यातच आहेस हे मला माहीत आहे. तू माझा हिरो आहेस. मला माहित्येय हा चित्रपट तू आमच्यासोबत बघत असशील.
  •  भूमी पेडणेकर -  "मी भावनांनी परिपूर्ण,भारावून गेलेले आहे आणि माझे रडणे थांबवू शकत नाहीये. एक उत्तम चित्रपट आहे दिल बेचारा. सुशांतने यात जीव ओतलाय. इतके वेदनादायक तरी सुंदर याआधी कधी अनुभवलेच नाही. शेवटचे नृत्य कमाल केले आहे. सुशांतच्या सर्व चाहत्यांसाठी आणि प्रियजनांसाठी ही एक ट्रीट आहे.
  • रितेश देशमुख - "वचन दिल्याप्रमाणे - मी माझ्या पॉपकॉर्नसह हा सिनेमा बघण्यासाठी सज्ज आहे.  सुशांत तू आकाशातील सर्वात उजळता तारा आहेस."
  • श्रीया पिळगावकर - मी दिल बेचारा पाहताना केवळ सुशांतच्या कुटूंबाचा आणि प्रियजनांचा विचार करत होते. त्यातील काही दृश्ये आणि संभाषणे पाहणे अवघड आहे. मला या सिनेमाने वास्तवाच्या अगदी जवळ नेले. आशा आहे की, सुशांत तुला सर्व प्रेम मिळेल. तू दशलक्ष तारे बनून आणि आमच्या अंत: करणात प्रवेश केलास."
  • स्वरा भास्कर -‘दिल बेचारा’ आता रिलीज झाला आहे. तो पहा आणि प्रेम व सकारात्मकता पसरवा.  लक्षात ठेवा की हे सुशांतबद्दल आहे. काही लोक आणि त्यांच्यात असलेला वाद याबद्दल नाही . मी सुशांतला प्रेम आणि शुभेच्छा पाठवित आहे आणि त्याच्या आत्म्यास शांती मिळो.

---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com