''त्या दिवसानंतर मी माझा वाढदिवस कधीच साजरा केला नाही'' - धर्मेंद्र

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आज वयाची ८६ वर्षे पूर्ण केली....
Dharmendra, Satvant Kaur
Dharmendra, Satvant KaurGoogle

मोठमोठे कलाकार लॅमलाइटमध्ये राहण्यासाठी अगदी त्यांची छोट्यातली छोटी गोष्ट मीडियाच्या माध्यमातनं पब्लिकपर्यंत कशी जाईल हे पाहत असतात. त्यासाठी मग त्यांच्या वाढदिवसापासून ते सिनेमाच्या सक्सेस पार्टीपर्यंत ते अगदी खरेदी केलेल्या नव्या घरापासून ते ब्रॅंडेड गाडीपर्यंत सा-या गोष्टींचं प्रमोशन करण्यासाठी हवा तेवढा पैसा खर्ची करायला ते तयार असतात. त्यात एखाद्या कलाकाराचा वाढदिवस असेल तर मग काय विचारू नका. फोटो छापून येण्यासाठी कधी कलाकाराचा तर वाढदिवस असलेल्या कलाकाराचा एक्सक्लुसिव्ह फोटो मिळवण्यासाठी मीडियाचा आटापिटा सुरू असतो. पण याबाबतीत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र मात्र अपवाद ठरले आहेत. त्यांच्या वाढदिवशी त्यांचा सेलिब्रेशन मूड कधीच नसतो;का ते जाणून घेऊया.

Dharmendra, Satvant Kaur
कतरिना-विकीच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी मिका सिंगने कळवला नकार...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र(Dharmendra) यांचा आज ८६ वा वाढदिवस. त्यांची कारकिर्द पाहिली तर देखणा चेहरा,रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि सफाईदार अभिनय यामुळे अनेक सुपर-डुपर हीट सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. आजही ते सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी एक मुलाखत दिली,ज्यात त्यांना वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं करणार याविषयी विचारलं गेलं. पण आपण आपल्या आईच्या मृत्यूनंतर कधीच वाढदिवस साजरा केला नाही असं उत्तर त्यांनी दिलं. जन्म देणारीच मला सोडून निघून गेली तर जन्मदिन साजरा करण्यात काय अर्थ आहे. धर्मेंद्र यांचे त्यांची आई सतवन कौर यांच्यावर जीवापाड प्रेम होते हे यावरनं स्पष्ट होते. तसं पाहिलं तर सर्वांनाच आई प्रिय असते पण आईच्या मृत्यूनंतर वाढदिवस साजरा न करणारे धर्मेंद्रांसारखी व्यक्ती विरळच. खरंतर जंगी वाढदिवस साजरा करीत स्वतःला लॅमलाइटमध्ये ते सहज ठेवू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही आणि म्हणूनच अशी मोठी व्यक्तिमत्त्व एक वेगळा आदर्श ठेवून जातात.

Dharmendra, Satvant Kaur
आमची पहिली भेट झाली तेव्हा ती स्टार होती अनं मी प्रॉडक्शन बॉय...

पुढे धर्मेंद्र म्हणाले की,''मी नुकतंच दिल्लीहून शुटिंग करून आलोय. माझ्या वाढदिवशी मी माझ्या घरी फार्महाऊसवर माझ्या कुटुंबासोबत असणार आहे. एरव्ही अनेकजण शुभेच्छा देण्यासाठी भेटायला यायचे पण यंदा कोरोनामुळे ते शक्य नसल्याने मी कोणाला भेटणार नाही. पुढे त्यांनी नमूद केलं की, जेव्हा मी ऐकतो की माझा वाढदिवस माझ्या फॅन्सनी सेलिब्रेट केलाय तेव्हा मला खरंच मनापासून खूप आनंद होतो''. धर्मेंद्र आता आपल्याला करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत जया बच्चन,शबाना आझमी,रणवीर सिंग,आलिया भट्ट दिसणार आहेत. ज्या पद्धतीनं धर्मेंद्र आजही वेगवेगळ्या शोजमध्ये गेस्ट सेलिब्रिटी म्हणून उपस्थिती दर्शवतात तेव्हा त्यांच्यात दिसणारी एनर्जी वाखाणण्याजोगी असते. धर्मेंद्र यांना ईसकाळ टीमकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com