अक्षयच्या 'सूर्यवंशी'वर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mehwish Hayat and Akshay Kumar

अक्षयच्या 'सूर्यवंशी'वर भडकली दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड, म्हणाली..

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा Akshay Kumar ‘सूर्यवंशी’ Sooryavanshi हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून १५० कोटी रुपयांहून अधिकची कमाई झाली आहे. सूर्यवंशीला प्रेक्षकांची पसंती मिळत असली तरी काहींकडून चित्रपटाच्या कंटेटवर आक्षेप नोंदवला जात आहे. आता पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातने 'सूर्यवंशी'वर निशाणा साधला आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 'सूर्यवंशी' हा चित्रपट इस्लामोफोबियाला प्रोत्साहित करतेय, असं तिने म्हटलंय. महविश हयात Mehwish Hayat ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड असल्याचंही म्हटलं जातं.

'सूर्यवंशी' हा इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देणारा बॉलिवूडमधील नवीन चित्रपट आहे. हॉलिवूडमध्ये गोष्टी बदलत आहेत आणि मला आशा आहे की सीमेपलीकडील लोकसुद्धा याचं पालन करतील. मुस्लिमांचे सकारात्मक चित्रण करायचे नसल्यास, कमीतकमी तुम्ही त्यांचे चित्रण करताना निष्पक्ष तरी रहा. द्वेष पसरवू नका, दरी कमी करण्याचा प्रयत्न करा, असं ट्विट महविशने केलं आहे.

हेही वाचा: "..तेव्हा हिंदू खलनायक का खटकले नाहीत?"; रोहित शेट्टीचा सवाल

हेही वाचा: 'वीर दासला चाबकाचे फटके दिले पाहिजे'; 'शक्तीमान' भडकला

दुसरीकडे पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्ते आणि वकील मोहम्मद जिब्रान नासिर यांनीसुद्धा ट्विट करत सूर्यवंशीवर टीका केली. 'जगातील सर्वात मोठी लोकशाही, दुसऱ्या क्रमांकावरचा लोकप्रिय देश, ८ प्रमुख धर्म, १२१ प्रमुख भाषा, २९ राज्ये आणि विविध संस्कृती, ४००० शहरे, ५५०० वर्षांहून जुनी संस्कृती असूनही प्रत्येक मोठ्या चित्रपटात आता हिंदुत्वाचं कथन पुन्हा ठासून सांगावं लागतंय. भारत किती गरीब झाला आहे', असं लिहित त्यांनी भारतातील चित्रपटांवर टीका केली आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये, अक्षय कुमार याने पीटीआयला सांगितलं होतं की, त्याच्यासाठी “फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे भारतीय”. अक्षयने दावा केला होता सूर्यवंशी चित्रपटाची कथा ही धर्माच्या दृष्टीकोनातून पाहणारी नसणार. "मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. माझा फक्त भारतीय असण्यावर विश्वास आहे आणि हेच चित्रपटात दाखवलं आहे.' असं अक्षयने सांगितलं होतं.

loading image
go to top