IFFI 2021: 'गोदावरी'ला दोन पुरस्कार; वाचा कोणकोणत्या चित्रपटांनी मारली बाजी

IFFI 2021: 'गोदावरी'ला दोन पुरस्कार; वाचा कोणकोणत्या चित्रपटांनी मारली बाजी

पणजी : देशाच्या सामाजिक सदसद्विवेकाने आणि सामाईक इतिहासाच्या पडद्याआड लपून गेलेल्या युद्धाच्या स्मृतिशोधाचे चित्रण करणाऱ्या जपानी दिग्दर्शक मासाकाझू कानेको यांच्या ‘रिंग वॉन्डरींग’ चित्रपटाला ५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या ‘सुवर्ण मयूर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील उत्तम भूमिकेसाठी जितेंद्र जोशी यांना सर्वोत्तकृष्ट अभिनेता तर स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना (शार्लोट) हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअममध्ये यंदाच्या ‘इफ्फी’चा थाटात समारोप झाला. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, डीएफएफचे संचालक चैतन्य प्रसाद, जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, मनोज वाजपेयी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

IFFI 2021: 'गोदावरी'ला दोन पुरस्कार; वाचा कोणकोणत्या चित्रपटांनी मारली बाजी
राष्ट्रवादीकडून औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी रंगीत तालीम सुरु, राजेश टोपेंनी घेतली आढावा बैठक

‘गोदावरी’ला मिळाले दोन पुरस्कार
‘इफ्फी’मध्ये स्पर्धा विभागात एकूण तीन भारतीय चित्रपट होते, त्यामध्ये ‘मी वसंतराव’ आणि ‘गोदावरी’ हे दोन मराठी चित्रपट होते. त्यातील ‘गोदावरी’तील निशिकांत कामत या भूमिकेसाठी जितेंद्र जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. रजत मयूर, १० लाख रुपये, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. त्याचप्रमाणे यावेळी ‘गोदावरी’ला परिक्षकांचा विशेष पुरस्कार देखील ब्राझीलच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या सिनेमासोबत संयुक्तपणे प्रदान करण्यात आला.

इतर ठळक पुरस्कार
विशेष उल्लेख : ‘द डॉर्मला’
दिग्दर्शन (पदार्पण) : सिमॉन फरिओल (द वेल्थ ऑफ द वर्ल्ड) आणि मारी अलेक्झाड्रिया (जहोरी) संयुक्तपणे
युनेस्को गांधी मेडल : ‘लिंगुई, द सॅक्रेड बॉण्डस्’
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : वाक्लॅव काद्रंका
सर्वोत्कृष्ट अभिनेते : जितेंद्र जोशी, अँजेला मोलिना
परीक्षकांचा विशेष पुरस्कार : गोदावरी (दिग्दर्शक : निखिल महाजन)
भारतीय चित्रपट व्यक्तिमत्व-२०२१ : प्रसून जोशी, गीतकार

IFFI 2021: 'गोदावरी'ला दोन पुरस्कार; वाचा कोणकोणत्या चित्रपटांनी मारली बाजी
Corona Update : राज्यात 832 नवीन रुग्ण तर 33 रुग्णांचा मृत्यू

धनुष ठरला ’ब्रिक्स’ सर्वोत्कृष्ट अभिनेता
यावर्षी ब्रिक्स सिनेमहोत्सव हा इफ्फीचाच भाग म्हणून दाखवण्यात आला. त्यामुळे मुख्य महोत्सवामध्ये हा महोत्सव झाला. या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट सिनेमाचे पारितोषिक दक्षिण अफ्रिकेच्या ‘बरकत’ आणि रशियाच्या ‘द सन अबॉव्ह नेव्हर सेट’ या चित्रपटांना संयुक्तपणे देण्यात आले. तर ब्राझिलच्या लुसिया मोराद यांना दिग्दर्शनासाठीचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय अभिनेता धनुष याला ‘असुरन’ चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि ब्राझिलची अभिनेत्री लारा बोल्डोरिनी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com