Ind vs Pak Asia Cup 2023 : 'मी बोललो होतो केएलच्या सासरेबुवांना एकदा जाऊया स्वामी नारायण मंदिरात!' आता घडलंय काय?

प्रसिद्ध भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहूल यांच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर भारतानं साडेतीनशे धावांचा डोंगर उभारल्याचे दिसून आले आहे.
Ind vs Pak Asia Cup 2023 KL Rahul Century Vyankatesh Prasad
Ind vs Pak Asia Cup 2023 KL Rahul Century Vyankatesh Prasadesakal

Ind vs Pak Asia Cup 2023 KL Rahul Century Vyankatesh Prasad : भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी कमाल केली आहे. काल पावसामुळे हा सामना थांबवण्याचा निर्णय पंचांनी घेतला होता. मात्र आज पुन्हा भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन चाहत्यांची वाहवा मिळवली आहे.

प्रसिद्ध भारतीय फलंदाज विराट कोहली आणि केएल राहूल यांच्या द्विशतकीय भागीदारीच्या जोरावर भारतानं साडेतीनशे धावांचा डोंगर उभारल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात पावसानं थोडीशी उघडीप घेतल्यानं भारतीय फलंदाजींनं पाकिस्तानी गोलंदाजीवर हल्लाबोल केला. विराट कोहली आणि केएल राहूल या दोन्ही फलंदाजीनं शतक साजरं केलं. आणि तमाम भारतीय प्रेक्षकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

केएल राहुलनं तर तीन वर्षाच्या कालावधीनंतर शतक पूर्ण केल्यानं त्याचं विशेष कौतुक होतं आहे. त्याच्यावर गेल्या काही महिन्यांपासून टीका होत आहे. आजी माजी भारतीय खेळाडूंनी देखील केएल राहुलला वेगवेगळ्या टीप्स देण्यास सुरुवात केली होती. केएल राहुलनं जर वेळीच त्याची कामगिरी सुधारली नसती तर त्याला विश्वकप साठी मुकावे लागले असते अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या होत्या.

यासगळ्यात भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादच्या त्या जुन्या ट्विटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. त्यामध्ये प्रसाद आणि केएल राहुलचे सासरे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यात प्रसादनं सुनील शेट्टी ला आपण केएल राहुलसाठी स्वामी नारायण मंदिरात जाऊया असे म्हटले होते. ते व्टिट पुन्हा एकदा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Ind vs Pak Asia Cup 2023 KL Rahul Century Vyankatesh Prasad
KL Rahul : राहुल - रोहितची चिंता मिटली! अण्णाच्या जावयानं पाकिस्तानविरूद्ध केलं जोरदार पुनरागमन

केएल राहुलनं शेवटचं शतक डिसेंबर २०२१ मध्ये केले होते. गेल्या दोन वर्षापासून तो शतकीय खेळीच्या शोधात होता. त्याच्यावर चाहते आणि नेटकऱ्यांनी देखील जोरदार टीका केली होती. अशातच त्यानं पाकिस्तान विरुद्धच्या खेळीनं चाहत्यांनी राहुलवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तो सोशल मीडियावर सध्या ट्रेडिंगचा विषय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com