'भारत - पाकिस्तान मॅच सगळ्यात मोठा 'जोक' कारण...

क्रिकेट विश्वातील सर्वात रंगतदार सामना आज होणार आहे.
'भारत - पाकिस्तान मॅच सगळ्यात मोठा 'जोक' कारण...

मुंबई - क्रिकेट विश्वातील सर्वात रंगतदार सामना आज होणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघामधील सामना हा केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील क्रिकेट रसिकांसाठी आनंदाची पर्वणी असते. गेल्या कित्येक दिवसांपासून या सामन्याची क्रिकेट रसिक वाट पाहत होते. अशावेळी आज होणाऱ्या या सामन्याचे क्रिकेट रसिकांसाठी असलेले महत्व कैकपटीनं वाढलेलं असतं. जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे असे कळल्यानंतर क्रिकेट रसिकांना या सामन्याची उत्सुकता लागल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

भारत पाकिस्तान मॅचचा फिव्हर शिगेला असताना त्यावर बॉलीवूड सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. त्यात एका बॉलीवूड सेलिब्रेटींनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. कमाल आर खाननं दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आतापर्यत आजी- माजी क्रिकेटपटूंनी या सामन्याविषयी, त्यात सहभागी झालेल्या खेळांडूविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजच्या सामन्यात कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करणार यावरुन देखील वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याची चुरस वाढल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कमाल खानची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहे.

त्या अभिनेत्यानं सोशल मीडियावरुन दिलेल्या प्रतिक्रियेवरुन त्याला अनेक कमेंट केल्या आहेत. त्यानं लिहिलं आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे निव्वळ विनोद आहे. याचे कारणही त्यानं सांगितलं आहे. तो म्हणतो साऱ्या जगाला माहिती आहे की, या सामन्यामध्ये भारतच जिंकणार आहे. तरी देखील त्यावरुन होणारी चर्चा म्हणजे जोक म्हणावी लागेल. अशा शब्दांत कमाल खाननं ही प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या त्या व्टिटला चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

'भारत - पाकिस्तान मॅच सगळ्यात मोठा 'जोक' कारण...
T20 World Cup : आज भिडणार भारत-पाकिस्तान, या अ‍ॅप्सवर पाहा Live
'भारत - पाकिस्तान मॅच सगळ्यात मोठा 'जोक' कारण...
भारत-पाकिस्तान युद्ध सुरु आहे का?, UP हिंसाचारावरुन राऊतांचा सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com