भारत - पाकिस्तान युद्धाचा 'Pippa': ईशानचा कडक लूक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधावर वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे.
भारत - पाकिस्तान युद्धाचा 'Pippa': ईशानचा कडक लूक

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधावर वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील काहींना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. आजही बॉर्डर सारखा चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. त्यातील प्रसंग प्रेक्षकांना भावनाविवश करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अजय देवणगणचा भुज द प्राइड ऑफ इंडिया नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी मोठी दाद दिली. मात्र यासगळ्यात सिद्धार्थ मल्होत्राच्या शेरशाहनं बाजी मारली. बॉक्स ऑफिसवर त्यानं मोठं यश संपादन केलं. अजय देवगणच्या तुलनेत शेरशाहला मिळालेलं यश कैकपटीनं जास्त होतं. प्रेक्षकांनाही सिद्धार्थच्या भूमिकेनं वेड लावलं. कियारानं लक्ष वेधून घेतलं होत. याशिवाय आता आणखी एका चित्रपटाच्या फर्स्ट लूकनं प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. तो चित्रपट म्हणजे पिप्पा.

अभिनेता ईशान खट्टर या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. पिप्पाची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हवा आहे. जेव्हा त्याचा फर्स्ट लूक व्हायरल झाला तेव्हापासून त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु आहे. भारत आणि पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. ईशाननं त्याच्या धडक चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी त्याच्या अभिनयावर काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र त्यानंतर त्यानं मीरा नायर यांच्या एका सीरिजमध्येही भूमिका केली होती. त्यात तो तब्बुच्या बरोबर होता. यावेळी त्याच्या भूमिकेचं कौतूक झाल्याचे दिसून आले होते. सध्या पिप्पाचे सोशल मीडियावर प्रमोशन सुरु झाले आहे. त्यात ईशाननं ब्रिगेडियर बलराम सिंग यांची भूमिका साकारली आहे.

भारत - पाकिस्तान युद्धाचा 'Pippa': ईशानचा कडक लूक
फक्त शाहिद कपूरसाठी जिम उघडली अन्....
भारत - पाकिस्तान युद्धाचा 'Pippa': ईशानचा कडक लूक
A Suitable Boy : 24 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत तब्बू करतेय रोमान्स!

पिप्पाची टॅगलाईन ही 1971 अ नेशन कम्स ऑफ अ एज अशी आहे. ईशानच्या फर्स्ट लूकलाही त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तो आर्मीच्या वेशभूषेत आहे. सोशल मीडियावरही त्याची चर्चा आहे. ईशाननं सोशल मीडियावरुन त्याचा लूक शेयर केला आहे. त्या फोटोला त्यानं कॅप्शनही दिली आहे. त्यात तो म्हणतो, पिप्पाची शुटींग सुरु, प्रचंड वेगानं. प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूरला आपल्या भावाचा हा लूक आवडला आहे. त्यानं त्यावर प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे की, तु खूपच प्रभावी दिसतो आहेस. तुझ्या या नवीन प्रोजेक्टसाठी मनपूर्वक शुभेच्छा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com