
Cannes Festival 2022: भारत 'कंट्री ऑफ ऑनर', असा बहुमान मिळवणारा पहिला देश
Entertainment News: जगभरामध्ये कान्स फिल्स फेस्टिव्हलची चर्चा नेहमीच होत असते. या (Film Festival) चित्रपट महोत्सवाला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. अशावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशातील चित्रपट या महोत्सवामध्ये सहभागी होत असतात. (Bollywood News) कान्समध्ये आपला चित्रपट सहभागी होणं हा दिग्दर्शकांसाठी वेगळी पर्वणी असते. त्यांच्यासाठी तो एक स्वप्नवत प्रवासही असतो. अशा कान्स चित्रपट (Bollywood Movies) महोत्सवामध्ये 'कंट्री ऑफ ऑनर' असा बहुमान मिळाला आहे. असा बहुमान मिळवणारा हा पहिलाच देश असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या कान्समध्ये संपूर्ण फोकस हा भारतावर असणार आहे. संबंध भारतीय प्रेक्षकांसाठी ही मोठी गोष्ट असणार आहे.
केंद्रीय सुचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी यासंबंधी अधिक माहिती दिली आहे. कान्समध्ये जी संधी भारताच्या वाट्याला आली आहे त्यामुळे त्यांना पाच वेगवेगळे स्टार्ट अप्स सुरु करता येणार आहे. फिल्म उद्योगामध्ये भारत हा सॉफ्ट पॉवर म्हणून ओळखला जातो. या देशामध्ये मोठी ताकद आहे. त्याचा प्रभावही सर्वांना माहिती आहे. त्यांच्याकडे खूप सारा पैसा देखील आहे. अशावेळी यासर्व गोष्टींचा वापर करुन नवीन काही करता येईल का याचा विचार यानिमित्तानं केला जाणार आहे. कान्समध्ये भारताला मिळालेली संधी ही सुवर्णसंधी असल्याचे अनुराग यांनी म्हटले आहे. कान्सच्या यंदाच्या महोत्सवामध्ये भारतावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी नवा देश असेल. आता तर पीएम देखील फ्रान्समध्ये आहे. त्यांना देखील ही गोड बातमी कळाली असेल.
हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही
भारतानं स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहे. तो अमृतमहोत्सव सध्या जोरदापणे साजरा होताना दिसतो आहे. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणी त्यांनी फ्रान्सचे पंतप्रधानांची भेट घेतली आहे. दुसरीकडे यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. भारताला यानिमित्तानं आपली सर्जनशीलता जगाला दाखविण्याची संधी मिळणार आहे.
Web Title: India Will Be First Country Of Honour At The Cannes Film Festival Anurag Thakur Tweet
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..