Video : बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॅटिंगवर युवराज सिंग झाला फिदा!

टीम ई-सकाळ
Friday, 3 January 2020

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'माऊली' या मराठी चित्रपटातून सैयामीने मराठी चित्रपटात पदार्पण केले.

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं तसं बरंच गहिरं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी विवाह केल्याचे आपणाला माहीत आहे. पण, बॉलिवूडमधील ब्युटींना कितपत क्रिकेट खेळता येते याची माहिती मात्र कोणालाच नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मात्र, याला एक अभिनेत्री अपवाद ठरली आहे. स्पोर्ट विषयावरील बायोपिकसाठी अनेक अभिनेते-अभिनेत्री खेळांचे प्रशिक्षण घेतात. मात्र, ही अभिनेत्री अभिनयाइतकीच खेळातही हुशार आहे. ही अभिनेत्री दुसरी कुणी नसून सैयामी खेर होय. सैयामीचे क्रिकेटप्रेम सर्वश्रुत आहे. फक्त क्रिकेटच नाही, तर टेनिस आणि इतर खेळांबद्दलही ती अनेक पोस्ट तिच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत असते. 

- सत्तेची रस्सीखेच आणि नात्यांचा जिव्हाळा म्हणजेच 'धुरळा'!

सैयामीने गुरुवारी (ता.2) एक व्हिडिओ अपलोड केल्याने ती चांगली क्रिकेटपटू असल्याचे दिसून आले. या व्हिडिओवर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने प्रतिक्रिया नोंदवली आहे. शॉट बडी! असे म्हणत सैयामीच्या खेळाचे कौतुकही त्याने केले आहे. 

- पंतने शेअर केले गर्लफ्रेंडसोबतचे बर्फातले फोटो, एकदा बघाच 

अभिनेत्री आणि क्रिकेटपटू सैयामी! 

मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजच्या क्रिकेट टीममध्येही सैयामी खेळली आहे. तसेच महाराष्ट्राच्या महिला टीमतर्फेही ती क्रिकेट खेळली आहे. पुढे तिने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. मात्र, खेळावरील प्रेम तिचं काही कमी झालं नाही. तिला क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस हे खेळही आवडतात. सैयामीने ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायनाशी दोन हात केले होते. त्यानंतर सायना आणि सैयामी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या. 

 याआधी सैयामीने गोलंदाजीतही आपले कौशल्य आजमावले होते. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. सैयामीने फलंदाजी करत असतानाचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्याला पसंती दर्शवली आहे. 

- Video : 'तुझे मेरी कसम' म्हणत रितेश-जेनेलिया शेतात करताहेत 'रोमान्स'!

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'माऊली' या मराठी चित्रपटातून सैयामीने मराठी चित्रपटात पदार्पण केले. या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचा रोल तिने साकारला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian former cricketer Yuvraj Singh impressed with Actress Saiyami Kher Front Foot Drive