
'इंडियन आयडॉल'च्या सायली कांबळेला मराठी चित्रपटात गायनाची संधी
इंडियन आयडॉलच्या Indian Idol बाराव्या पर्वाचे व्यासपीठ गाजवून आपल्या सुरेल स्वरांनी कोट्यवधी हृदयांवर अधिराज्य गाजवणारी गायिका सायली कांबळेच्या Sayali Kamble स्वप्नवत प्रवासाला आता सुरूवात झाली. इंडियन आयडॉलचे पर्व संपताना सिनेसृष्टीत पदार्पण करायचे सायलीचे स्वप्न पूर्ण झाले. जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीज Kolhapur Diaries या चित्रपटासाठी सायलीने नुकतेच गाणे गायले.
गायिका सायली कांबळे म्हणते, “मला विश्वासच बसत नाही आहे, की माझं स्वप्न पूर्ण झालंय. इंडियन आयडॉलमध्ये जाण्याचं कारणचं होतं, लोकांनी मला ओळखावं आणि माझं संगीत क्षेत्रात करियर सुरू व्हावं. इंडियन आयडॉलचा ग्रँड फिनाले झाल्यनंतर लगेच हातात काम असणं, हे भाग्याचं आहे. लहानपणापासून अवधूत गुप्तेंची मी चाहती आहे आणि त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळतेय. चित्रपटाचे दिग्दर्शक जो राजन यांनी मला ही संधी दिली याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे.”
हेही वाचा: Indian Idol: जाणून घ्या विजेत्यांना बक्षिस म्हणून किती रक्कम मिळते?
हेही वाचा: अभिजीत खांडकेकरची सोलो ट्रिप; लेह-लहाखमध्ये भटकंतीचा अविस्मरणीय अनुभव
जो राजन दिग्दर्शित कोल्हापूर डायरीजच्या ह्या गाण्याला अवधूत गुप्तेनी संगीत दिलंय. स्वप्नील बांदोडकर आणि सायली कांबळे यांनी मिळून हे रोमँटिक गाणं गायलंय. हे गाणं लवकरच गायत्री दातार आणि भूषण पाटील यांच्यावर चित्रीत होणार आहे.
संगीतकार, गायक अवधूत गुप्ते म्हणतात, “दिग्दर्शक जो राजन यांना सायलीचा आवाज खूप आवडला होता. त्यामुळे त्यांनीच मला सायलीचे नाव या गाण्यासाठी सुचवले. ती किती उत्तम गायिका आहे, ते ती दरवेळी सिद्ध करते. सायलीच्या रूपाने एक प्रतिभावान गायिका महाराष्ट्रालाच नाही तर अख्या जगाला मिळाली, असं मला वाटतं. ”
Web Title: Indian Idol 12 Fame Sayali Kamble Got An Offer To Sing In Marathi Movie Kolhapur Diaries
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..