esakal | Indian Idol: पहिला विजेता अभिजीत सावंत आहे कुठे?
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Idol: पहिला विजेता अभिजीत सावंत आहे कुठे?

Indian Idol: पहिला विजेता अभिजीत सावंत आहे कुठे?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मोहब्बते लुटाउंगा हे गाणं आठवतयं, इंडियन आयडॉलचा (indian idol) पहिला विजेता अभिजीत सावंतनं त्या स्पर्धेच्या फायनलमध्ये हे गाणं गायलं होतं. त्यावेळी त्या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. अभिजीतचं नाव सगळ्यांच्या तोंडी आलं. तो इंडियन आयडॉलचा पहिला विजेता होता. त्या स्पर्धेनंतर तो मोठा सेलिब्रेटी झाला. सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा होती. वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्येही तो सहभागी झाला होता. याशिवाय काही हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी त्यानं गाणीही गायली. आज त्याचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देणार आहोत. आता अभिजित सावंत आहे कुठे, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो न दिसल्यानं चाहते त्याची विचारपूस करत आहे.

2004 मध्ये इंडियन आयडॉलच्या फायनलचा विजेता म्हणून अभिजीत सावंतचं नाव जाहीर झालं होतं. देशातल्या पहिल्या रियॅलिटी शो ला त्यावेळी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी त्या कार्यक्रमाला आपली पसंती दर्शवली होती. त्यात इंडियन आयडॉलची क्रेझ प्रचंड होती. या शो नं प्रेक्षकांना वेड लावले होते. या रियॅलिटी शो च्या फायनलच्या वेळी तर देशभरातील चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. तो फिव्हर अजूनही चाहते विसरलेले नाहीत. अभिजीत आणि अमित साना यांच्यात चुरशीची स्पर्धा होती. त्यात अभिजीतनं बाजी मारली आणि तो पहिला इंडियन आयडॉल झाला. आता अभिजित मोठा सेलिब्रेटी झाला आहे.

त्यानंतर अभिजितचा मोहब्बते लुटाउंगा हा अल्बम रिलिज झाला होता. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नच बलिए या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर आला होता. आजही लोकांना इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजित सावंत माहिती आहे. त्याच्या वेगवेगळ्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. अभिजित हा आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करतो आहे.

हेही वाचा: आर्यनच्या अटकेनंतर सलमान खान पोहोचला शाहरुखच्या घरी!

हेही वाचा: आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी; पाहा व्हिडिओ

अभिजितचा दुसरा अल्बम जुनूनही लोकप्रिय झाला होता. त्यानं इमरान हाश्मीच्या आशिक बनाया आपने मधील मरजावा हे गाणही गायल होतं. ते आजही लोकप्रिय आहे. मात्र त्यानंतर तो काही काळ गायब झाला. गाण्यामधील करिअर सोडून तो त्याच्या पत्नीसह नच बलिएमध्ये सहभागी झाला होता. त्याच्या सीझन 4 मध्ये त्याला चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला. सध्या अभिजित वेगवेगळ्या देशांमध्ये गाण्याचे शो करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बॉलीवूडमध्ये त्यानं अनेकदा आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नही केला. मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही.

loading image
go to top