esakal | 'अजय-अतुल' पहिल्या 'इंडियन आयडल- मराठी'चे परिक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

'अजय-अतुल' पहिल्या 'इंडियन आयडल- मराठी'चे परिक्षक

'अजय-अतुल' पहिल्या 'इंडियन आयडल- मराठी'चे परिक्षक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या हटके संगीतानं केवळ मराठीच नाहीतर बॉलीवूडमध्ये (bollywood) देखील वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अजय अतुल (ajay atul) या संगीतकारांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. आता त्यांचा पहिल्या मराठी इंडियन आयडॉलच्या परिक्षकपदी निवड झाली आहे. पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. सोनीच्या वतीनं पहिल्यांदाच मराठी इंडियन आयडॉलची घोषणा करण्यात आली आहे. हिंदीमध्ये प्रचंड यशस्वी झालेल्या या कार्यक्रमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले. आता हा रियॅलिटी शो मराठीत येणार असल्यानं चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मराठी कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 'इंडियन आयडल - मराठी' ही सुवर्णसंधी मोठी पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमाचे परीक्षणही संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत. यावेळी पुण्यात नारायण पेठ येथे भित्तीचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते. आपल्या संगीताचं गारुड या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच अशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. .

पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढलं आहे. 'अजय-अतुल' या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला 'अजय-अतुल' हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा: 'शाहरुख तुला इस्लामचा विसर पडला काय?' नेटकऱ्यांनी टोचलं...

हेही वाचा: फक्त शाहरुखचा मुलगा अशी आर्यनची ओळख नाही तर...

loading image
go to top