फक्त शाहरुखचा मुलगा अशी आर्यनची ओळख नाही तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फक्त शाहरुखचा मुलगा अशी आर्यनची ओळख नाही तर...

फक्त शाहरुखचा मुलगा अशी आर्यनची ओळख नाही तर...

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानच्या (shahrukh khan) मुलाची आर्यन खानची (aryan khan) एनसीबीनं (ncb) चौकशी केली आहे. काल त्याला एनसीबीनं ड्रग्ज केसमध्ये ताब्यात घेतलं आहे. त्यावरुन बॉलीवूड विश्वात खळबळ उडाली आहे. नेमकं काय हे प्रकरण आहे याविषयी बॉलीवूडसह प्रेक्षकांनाही कुतूहल आहे. त्या प्रकरणामध्ये शाहरुखच्या मुलाचे नाव आल्यानं त्याला वेगळं वळण मिळालं आहे. काल नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं कॉर्डिलिनया एम्प्रेस शिपवर चाललेल्या पार्टीवर छापा मारला. त्यात त्यांनी अनेकांना अटक केली आहे. एनसीबीच्या कारवाईनं बॉलीवूड हादरुन गेले आहे. या कारवाईतून आणखी काही नावं समोर येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

एनसीबीनं आर्यन खानची चौकशी सुरु केली आहे. त्याचे त्या पार्टीशी काय कनेक्शन आहे हे पाहण्यासाठी त्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. आर्यननं दिलेल्या माहितीनुसार आपलं त्या पार्टीशी कोणतेही देणंघेणं नाही. मला त्या पार्टीचे निमंत्रणही नव्हते. अद्याप आर्यनला अटक करण्यात आली नसली तरी त्याच्याकडे या प्रकरणात संशयित म्हणून पाहिले जात आहे. याविषयीची अधिक माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. आर्यन हा शाहरुख आणि गौरी खानचा मुलगा आहे. त्यांना सुहाना नावाची मुलगीही आहे. ती देखील सोशल मीडियावर मोठी सेलिब्रेटी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना अब्राहम नावाचा आणखी एक मुलगा आहे. आर्यनविषयी सांगायचं झाल्यास, त्यानं 2019 मध्ये द लायन किंग मधून पदार्पण केलं. त्यानं त्यात सिम्बा पात्रासाठी आवाज दिला होता. शाहरुखनं त्याला त्या लायन किंगसाठी लाँच केल्याचीही चर्चा होती.

आगामी काळामध्ये काही महत्वाच्या प्रोजेक्टमध्येही आर्यन दिसणार आहे. त्यासाठी शाहरुखनं काही निर्मात्यांशी संपर्कही साधला आहे. आपल्या मुलाला बॉलीवूडमध्ये आणण्यासाठी तो उत्सुक असल्याचेही सांगितले जाते. मात्र सध्याच्या त्याच्या या प्रकरणामुळे ते पदार्पण लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे. काल पासून आर्यनच्या नावानं वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या भोवतीचे गुढ आणखी वाढले आहे. त्याचा या प्रकरणात खरचं सहभाग आहे किंवा नाही हे लवकरच समोर येईल.

टॅग्स :Bollywood Newsaryan khan