Vicky Kaushal सारासोबत फिरला दुचाकीवरून; इंदौरमध्ये एकाने केली तक्रार

Vicky Kaushal
Vicky KaushalTwitter
Summary

हे बेकायदेशीर आहे असून मी पोलिसात लेखी तक्रार दिली असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसंच या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आलीय.

अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) नुकताच कॅटरीनासोबत (Katrina Kaif) विवाहबंधनात अडकला. यानतंर आता तो इंदौरमध्ये (Indore) त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने फिरताना दिसला. दरम्यान, इंदौरमध्ये सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) दुचाकीवरून फिरल्यानंतर आता त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंदौरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने विकी कौशल विरोधात तक्रार केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, इंदौरमध्ये सारा अली खान आणि विकी कौशल ज्या बाईकवरून फिरले त्याचा नंबर आणि आपल्या स्कूटीचा नंबर एकच असल्याचं तक्रार दाखल करणाऱ्याने म्हटलं आहे. चित्रपटाच्या सीनमध्ये जो बाईकचा नंबर दाखवण्यात आला आहे तो आपला असल्याचं तक्रार दाखल करणाऱ्या जय सिंह यादव यांनी म्हटलं आहे. तसंच आपल्या परवानगीशिवाय नंबरचा वापर करता येणार नाही असंही तक्रारीत म्हटलं आहे.

Vicky Kaushal
'देवों के देव महादेव' मधला मोहित लग्नाच्या बेडीत

तक्रार करणाऱ्या यादव यांनी म्हटलं की, चित्रपटाच्या सीनमध्ये दिसत असलेल्या बाईकचा नंबर माझा आहे. मला नाही माहिती चित्रपट बनवणाऱ्यांना याची माहिती आहे की नाही. माझ्या नंबरचा माझ्या परवानगीशिवाय वापर करता येणार नाही. हे बेकायदेशीर आहे असून मी पोलिसात लेखी तक्रार दिली असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसंच या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यादव यांनी केलीय. त्यांनी तक्रारीसोबत आपल्या दुचाकीच्या नंबर प्लेटचा फोटोही शेअर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com