Mohit Raina
Mohit RainaInstagram

'देवों के देव महादेव' मधला मोहित लग्नाच्या बेडीत

Summary

देवों के देव महादेव मधल्या मोहित रैनाने नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

टीव्हीवरील प्रसिद्ध देवों के देव महादेव (Devo ke Dev Mahadev) मालिकेत भगवान शंकराची भूमिका साकारणाऱ्या मोहित रैनाने (Mohit Raina) त्याच्या चाहत्यानां सरप्राइज दिलं आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. गर्लफ्रेंड आदितीसोबत लग्न केल्याची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली आहे.

मोहितने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना म्हटलं की, प्रेम कोणत्या अडथळ्यांना मानत नाही, ते सीमा ओलांडतं, कुटुंबाच्या आशिर्वादाने आता आम्ही दोन नाही तर एक झालो आहे. नव्या प्रवासासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत.

Mohit Raina
सोनाली कुलकर्णीचा नवऱ्यासोबतचा डान्स तुफान व्हायरल;चाहते म्हणाले,भारीच!

चाहत्यांनी कमेंट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, अखेर शिवाला त्याची पार्वती मिळालीच. तर काहींनी हे कधी झालं असा प्रश्न विचारला आहे. मोहित रैनाने शिद्दत या चित्रपटात शेवटचं काम केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com