esakal | सेक्सी लूकच्या अट्टाहासापायी अभिनेत्रीनं गमावला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

aarti agrawal

सेक्सी लूकच्या अट्टाहासापायी अभिनेत्रीनं गमावला जीव

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - इंद्रा द टायगर (indra the tiger) या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर मोठा प्रभाव निर्माण केला होता. 2002 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो बॉक्स ऑफिसवर (box office) प्रचंड गाजला होता. सध्या एका लोकप्रिय मनोरंजन वाहिनीवर हा चित्रपट अनेकदा दाखविण्यात येतो. त्यात चिरंजीवी (chiranjeevi), सोनाली बेंद्रे (sonali bendre) आणि आरती अग्रवाल (aarti agrawal) यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रसिद्ध गायक एस पी बालासुब्रमण्यम यांचा कॅमिओ देखील या चित्रपटात होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं कमाल केली होती. (indra the tiger movie actress aarthi agarwal death after liposuction sugery yst88)

यात आरती अग्रवालची महत्वाची भूमिका होती. त्यात तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेनं आरती लोकप्रिय झाली. तिचं मोठं नाव व्हायला सुरुवात झाली होती. वयाच्या 16 व्या वर्षांपासून चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या आरतीनं 31 व्या वर्षांपर्यत काम सुरु ठेवलं होतं. तिनं आपल्या छोट्याशा करिअरमध्ये चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबु, रवि तेजा, ज्युनिअर एनटीआर, प्रभास सारख्या सर्व कलाकारांबरोबर तिनं काम केलं आहे.

आरतीनं आपल्या करिअरमध्ये 25 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 5 मार्च 1984 मध्ये तिचा जन्म न्यु जर्सीमध्ये (new jersiy) झाला होता. तिला एका शो मध्ये अभिनेता सुनील शेट्टीनं पाहिलं होतं. तिला त्यानं त्या शो मध्ये डान्स करण्यासही सांगितलं. तेव्हा ती 14 वर्षांची होती. तिचा डान्स पाहून सुनील शेट्टीनं तिला बॉलीवूडमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. आरतीनं मात्र वयाच्या 16 व्या वर्षी पागलपन आणि नुव्वु नाकु नचवमधून डेब्यु केला होता.

हेही वाचा: 'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा

हेही वाचा: पवित्र रिश्ता 2: अभिज्ञा भावे साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

आरती ही फॅटनेसच्या आजारानं त्रस्त होती. आणि मृत्युपूर्वी तिनं लिपोसक्शनची सर्जरीही केली होती. त्या सर्जरीमधून तिच्या शरिरातील अतिरिक्त फॅट हटविण्यात आली होती. काही करुन आपल्याला सुंदर दिसायचे आहे अशा अट्टाहसानं तिनं आपलं रुप बदलण्याचा प्रयत्न केला होता. सेक्सी दिसणं यासाठी जाडी कमी करणं ही तिची प्रायोरिटी होती. याचा परिणाम तिच्या शरीरावर झाल्याचे दिसून आले आहे.

loading image