Yoga Day 2023 : योगा करायला मलायका आली, बघणाऱ्यांची गर्दी झाली!

मलायका जेव्हा तिचे फोटो पोस्ट करते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा चर्चा तिच्या फिटनेसची होते. तिच्या वयाची होते. मलायकानं चाळीशी केव्हाच पार केली आहे.
International Yoga Day 2023 Malaika Fitness Video
International Yoga Day 2023 Malaika Fitness Videoesakal

International Yoga Day 2023 Malaika Fitness Video : आंतरराष्ट्रीय योगा डे च्या निमित्तानं आता सोशल मीडियावर बॉलीवूड सेलिब्रेटींकडून वेगवेगळ्या पोस्ट समोर यायल्या सुरुवात झाली आहे. मात्र यासगळ्यात काही अभिनेत्री अशा आहेत त्यांना योगा करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नाही. त्यात मलायकाचे नाव घ्यावे लागेल.

मलायका जेव्हा तिचे फोटो पोस्ट करते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा चर्चा तिच्या फिटनेसची होते. तिच्या वयाची होते. मलायकानं चाळीशी केव्हाच पार केली आहे.मात्र अजूनही तिचा फिटनेस हा नव्या अभिनेत्रींना चक्रावून टाकतो. खासकरुन सध्या बॉलीवूडमधील ज्या तिशीतील अभिनेत्री आहेत त्यांच्यासाठी मलायका रोल मॉडेल आहे असे म्हटले जाते. मलायकानं नेहमीच तिच्या बोल्डनेसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

आता योगा डे च्या निमित्तानं मलायकानं जो व्हिडिओ शेयर केला आहे त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया भन्नाट आहे. मलायकाच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. भारतातील प्रभावी फिटनेस फ्रीक सेलिब्रेटी आहेत त्यात मलायकाचे नाव पहिल्या पाच मध्ये असते. तिला सोशल मीडियावर फॉलो कऱणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

International Yoga Day 2023 Malaika Fitness Video
Adipurush Review : वेगळेपणाच्या नावाखाली फसलेला 'आदिपुरुष'! सगळं गंडलयं...

जेव्हा बॉलीवूडमध्ये फिट राहण्याबद्दल ना कुणी बोलत होतं ना कुठली चर्चा होती अशावेळी ज्यांनी पहिल्यांदा फिटनेसविषयी बोलायला सुरुवात केली त्यात मलायका आणि शिल्पा शेट्टीचं नाव घेता येईल. या दोन्ही अभिनेत्री सध्याच्या घडीला वुमन फिटनेस वर्ल्डमधील मोठं नाव झालं आहे. तसेच टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अनेक रियॅलिटी शो मध्ये त्या दोघीजणी दिसूनही आल्या आहेत. सध्या योगा डे च्या निमित्तानं त्या दोघींच्या नावाची चर्चा होताना दिसते आहे.

International Yoga Day 2023 Malaika Fitness Video
Adipurush: 'आदिपुरुष भाजपचा प्रोपगंडा', टीव्ही मालिकेतल्या 'रामानं' सोडला बाण!

काही वेळापूर्वी शिल्पानं तिच्या इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दुसरीकडे मलायकानं देखील चाहत्यांना व्हिडिओ पोस्ट करुन खूश केलं आहे. मलायकानं तिच्या चाहत्यांना नेहमीच योगा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. तिनं कोरोनाच्या काळात नेटकऱ्यांसाठी योगासाठी काही खास वर्कशॉप्सही घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com