'शेरशहा' नंतर कियारा-सिद्धार्थ पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र? KIara Advani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Is Kiara Advani reuniting with beau Sidharth Malhotra for a romantic film?

'शेरशहा' नंतर कियारा-सिद्धार्थ पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र?

सध्या इंडस्ट्रीत कियारा अडवाणी(Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा(Sidharth Malhotra) यांच्या प्रेमाची भलतीच चर्चा सुरु आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशी बातमीही उडती कानावर पडलीय. अर्थात अनेक कार्यक्रमात त्यांनी डोळ्यानं एकमेकांना केलेल्या खाणाखूणा कॅमेऱ्याच्या नजरेतून काही सुटलेल्या नाहीत. 'शेरशहा' सिनेमाच्या निमित्तानं हे दोघे एकत्र आले अन् यांचे सूर जुळले. यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना भावली आणि मग ऑफ स्क्रीनही या दोघांनी एकत्र यावं अस साऱ्यांना वाटू लागलं. आता बातमी कानावर पडतेय कियारा आणि सिद्धार्थ पुन्हा एका सिनेमाच्या निमित्तानं मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.(Is Kiara Advani reuniting with beau Sidharth Malhotra for a romantic film?)

हेही वाचा: Alia Bhatt Pregnancy: 'मी पार्सल नाही',आलियानं मीडियाला फटकारलं

एका न्यूज पोर्टलनं दिलेल्या वृत्तानुसार,सिद्धार्थ आणि कियारा पुन्हा एकदा एका रोमॅंटिक सिनेमाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत. दोघा कलाकारांना सिनेमाची स्क्रीप्ट आवडल्याचं बोललं जात आहे. फक्त कागदोपत्री सिनेमा साइन करायचं तेवढं बाकी आहे. त्या दोघांची 'शेरशहा' मधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती.

हेही वाचा: Katrina Kaif Good News: लग्नानंतरची कतरिनाची पहिलीच मोठी घोषणा...

कियारा आणि सिद्धार्थ काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं वृत्त आहे. अर्थात त्यांनी समोरुन यावर काही भाष्य केलं नसलं तरी सोशल मीडियावर पोस्ट केले जाणारे फोटो,पोस्ट्स यांच्यात काही तरी सुरु आहे याकडेच बोट दाखवत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे या बातमीनं जोर धरला होता पण त्यानंतर करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघे लव्ह बर्ड्स एकत्र दिसले अनं चाहत्यांचा जीव दोघांत सारं सुरळीत आहे या चांगल्या बातमीनं भांड्यात पडला.

हेही वाचा: Koffee With Karan 7: ट्रोलर्सवर पलटवार करत करणने जाहीर केली शो ची तारीख...

सिद्धार्थ सध्या रोहित शेट्टीच्या इंडियन पोलिस फोर्स साठी शूटिंग करत आहे. तसंच,मिशन मजनू,थॅंक गॉड असे त्याचे सिनेमेही प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तर दुसरीकडे कियाराचा नुकताच जुग जुग जियो सिनेमा प्रदर्शित झाला आहे. भूलभूलैय्या २ सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली आहे. गोविंदा नाम मेरा या सिनेमात ती विकी कौशल,भूमी पेडणेकर सोबतही दिसणार आहे.

Web Title: Is Kiara Advani Reuniting With Beau Sidharth Malhotra For A Romantic Film

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top