Isha Keskar आली रोमँटिक मूडमध्ये.. भर पार्टीत डान्स करुन बॉयफ्रेंड सोबत.. व्हिडिओ होतोय व्हायरल

या व्हिडिओत रिशी आणि ईशा एकदम रोमँटिक मुडमध्ये डान्स करत आहेत
isha keskar, rishi saxena, isha keskar love story
isha keskar, rishi saxena, isha keskar love storySAKAL

Isha Keskar News: केवड्याचं पान या गाण्यातून सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे इशा केसकर. इशा केसकर खऱ्या आयुष्यात तिचा फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. इशाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.

या व्हिडिओत इशा (Isha Keskar) तिचा बॉयफ्रेंड रिशी सक्सेना (Rishi Saxena) सोबत धम्माल डान्स करताना दिसतेय. इशाचा बॉयफ्रेंड रिशीचा आज वाढदिवस आहे.

(isha keskar romantic dance with her boyfriend rishi saxena, video viral)

isha keskar, rishi saxena, isha keskar love story
Vaalvi: 'वेड' नंतर 'वाळवी'चे गौरवशाली ५० दिवस पूर्ण, प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये खास ऑफर

काहे दिया परदेस फेम अभिनेता रिशी सक्सेनाचा आज वाढदिवस आहे. रिशीच्या वाढदिवसानिमित्त इशाने सोशल मीडियावर खास व्हिडिओ पोस्ट केलाय.

या व्हिडिओत रिशी आणि ईशा एकदम रोमँटिक मुडमध्ये डान्स करत आहेत. एकमेकांसोबत डान्स करत दोघेही एकमेकांना मिठी मारत आहेत. याशिवाय सुरु असलेल्या लाईव्ह कॉन्सर्टचा आनंद घेत आहेत.

isha keskar, rishi saxena, isha keskar love story
सिक्युरिटी गार्डचं दुर्लक्ष भोवलं.. Shah Rukh Khan च्या बंगल्यात दोन अज्ञात तरुणांची घुसखोरी, काय आहे प्रकरण?

इशा आणि रिशीची लव्हस्टोरी:

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर या दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं. त्यावेळी दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नाही. पुढे झी गौरव पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांच्यात पहिल्यांदा सविस्तर बोलणं झालं. मैत्री वाढत होती.

इशा अनेकदा ऋषीला कॉफीसाठी विचारत होती. ईशा काहीतरी निमित्त काढून रिशीला भेटत होती. पण त्याला काही कळत नव्हतं.

तब्बल वर्षभर दोघांमध्ये मैत्री खूप चांगल्या वळणावर गेली. आणि नंतर रिशीलाच कळले कि त्याला इशा आवडायला लागली आहे.

पण हे प्रेम आहे कि वेगळी भावना हे मात्र रिशीला कळत नव्हते. पण अखेर त्याने इशा समोर भावना व्यक्त केल्या. ईशाने सुद्धा काही दिवसानंतर रिशीच्या प्रपोजला होकार दिला. आणि पुढे दोघांची मैत्री एक पाऊल पुढे गेली.

isha keskar, rishi saxena, isha keskar love story
Madhura Joshi: गोरी गोरी पान.. फुलासारखी छान

इशाचा जानेवारी २०२३ मध्ये सरला एक कोटी हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला.

ईशाच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. तर रिशी सक्सेनाने काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून अभिनयाची चुणूक दाखवली. रिशीने फत्तेशीकस्त, पावनखिंड अशा मराठी सिनेमात अभिनय केलाय. ईशा आणि रिशी लग्न कधी करणार याची दोघांच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com