ईशान खट्टर आणि अनन्या पांडे प्रथमच येताय एकत्र; चित्रपटाचा टीझर झालाय लॉन्च

संतोष भिंगार्डे
Wednesday, 26 August 2020

दिग्दर्शक करण मकबूल खान म्हणाले की, खाली पिली ही एक तरुण, मोहक, वेडसर रोलर-कोस्टर राइड आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल."

मुंबई :  'धडक' चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता ईशान खट्टर आणि 'स्टुडंट ऑफ दि ईअर - २' मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अनन्या पांडे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यांच्या नव्याकोऱ्याया चित्रपटाचा टीझर चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच लाँच केला आहे. या मनोरंजक टीझरमध्ये ईशान आणि अनन्या आपल्या सर्वांना रोमांचकारी रोलर-कोस्टर राईडवर नेण्यासाठी तयार आहेत. दरम्यान, एका मिनिटाच्या या टिझरमध्ये अनन्या आणि ईशान पिवळ्या-काळ्या टॅक्सीमध्ये प्रवास करताना दिसत आहेत. 'खाली पिली' असे या चित्रपटाचे नाव असून करण मकबूल खान यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

यशराजच्या विनोदी चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर

या चित्रपटाबाबत निर्माते अली अब्बास जाफर म्हणाले, “खाली पिली" हा चित्रपट संपूर्ण देसी मनोरंजन करणारा आहे.  ईशान, अनन्याची दमदार केमिस्ट्री आणि जयदीपची विश्वासार्हता या चित्रपटाचा अनुभव विलक्षण बनवते.'' निर्माता हिमांशू किशन मेहरा सांगतात, "आम्ही हा चित्रपट खूप मनापासून आणि परिश्रमांनी बनविला आहे आणि प्रेक्षकांना लवकरच आमच्या चित्रपटाचा अनुभव देण्यास मी उत्सुक आहे.  मला आशा आहे की अशा अभूतपूर्व काळात "खाली पिली" प्रेक्षकांचे मनोरंजन करेल."

दीपिका पदूकोण सप्टेंबरमध्ये सुरु करणार 'या' सिनेमाचं शूटींग, श्रीलंकेला जाण्याचा प्लान तुर्तास रद्द

दिग्दर्शक करण मकबूल खान म्हणाले की, "ईशान आणि अनन्या चमकदार कामगिरी करणारे दोन पॉवरहाऊस आहेत. त्यांच्याबरोबर काम केल्याचा मला फार आनंद झाला आहे. खाली पिली ही एक तरुण, मोहक, वेडसर रोलर-कोस्टर राइड आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना ती नक्कीच आवडेल."
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ishan khattar and ananya pandey comes together for new bollywood film