esakal | सेलिब्रेटिंना ड्रग्जचे व्यसन आहे असे म्हणणे म्हणजे मूर्खपणा - जावेद अख्तर
sakal

बोलून बातमी शोधा

It is foolish to say that celebrities are addicted to drugs said by Javed Akhtar

एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. रकुलसोबत दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा खान यांची एनसीबीकडून सध्या चौकशी सुरु आहे. गीतकार आणि लेखऱ जावेद अख्तर यांनी बॉलिवूडची बाजू घेतली असुन आरोग्याची इतकी काळजी घेणाऱ्या या सेलिब्रेटींना  ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. 
एका वृत्तवाहिनीशी बोलताना फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सेलिब्रेटिंना ड्रग्जचे व्यसन आहे असे म्हणणे म्हणजे मूर्खपणा - जावेद अख्तर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई ;  बाँलीवुड कलाकारांच्या समर्थनार्थ आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर रिंगणात उतरले आहे. आतापर्यत ज्या  कलाकारांची नावे चौकशीसाठी समोर आली आहेत त्यांची बाजु अख्तर यांनी घेतली आहे.  फिल्म इंडस्ट्रीत सगळे ड्रग्जचं व्यसन असणारी लोकं असल्याचं बोललं जात आहे. मी १९६५ पासून इंडस्ट्रीत आहे. आजची पिढी जितकी आरोग्याची काळजी घेतं तेवढं कोणीच नव्हतं”. असे त्यांनी म्हटले आहे. 

डग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत .एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. रकुलसोबत दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा खान यांची एनसीबीकडून सध्या चौकशी सुरु आहे.   गीतकार आणि लेखऱ जावेद अख्तर यांनी बॉलिवूडची बाजू घेतली असुन आरोग्याची इतकी काळजी घेणाऱ्या या सेलिब्रेटींना  ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. 

रकुलप्रीत सिंहने रिया चक्रवर्तीवरंच फोडलं खापर, ड्रग्स सेवन प्रकरणी दिला नकार

एका वृत्तवाहिनीशी बोलताना फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. ते म्हणाले,  “विषय बदलत चालले आहेत, पण फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही. जिथून विषय सुरु झाला होता तो सगळे विसरले. त्यानंतर आलेले विषयही विसरले, कारण त्यात सिद्ध करण्यासाठी काहीही सापडलं नाही. फिल्म इंडस्ट्रीत सगळे ड्रग्जचं व्यसन असणारी लोकं असल्याचं बोललं जात आहे.

करण जोहरने दिलं स्पष्टीकरण, 'पार्टीमध्ये ड्रग्सचं सेवन केल्याच्या बातम्या खोट्या'

मी १९६५ पासून इंडस्ट्रीत आहे. आजची पिढी जितकी आरोग्याची काळजी घेतं तेवढं कोणीच नव्हतं”.“जुने चित्रपट तुम्ही पाहिले तर हिरोईनचं वजन थोडं जास्त आहे, हिरोचं पोट पुढे आलं आहे. पण आजच्या मुला-मुलींना पाहिलं तर ते फिजिकली किती फिट आहेत. दिवसातले दोन ते तीन तास ते व्यायाम करतात. एकदम स्लीम, फिट, एकही फॅट जास्त नाही. हे तुम्हाला ड्रग्ज व्यसनी वाटतयात. जे ड्रग्ज घेतात त्यांना दुरुनही ओळखता येतं. ही आजकालची मुलं एवढी फिट आहेत की त्यांना ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणाचं आहे,” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top