'पोरगा म्हणे बापाला,माझ्याबद्दल तुम्ही न बोललेचं बरं'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 24 November 2020

सोशल मीडियावर कुमार सानु, जान सानू या बाप आणि पोरामधील वाद चांगलाच रंगला आहे. त्याने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मुंबई - प्रख्यात गायक कुमार सानू यांचा मुलगा अशी खरं तर जान कुमार सानूची ओळख आहे. त्यानंतर त्याने बिग बॉस नावाच्या एका रियॅलिटी शो मध्ये मराठी भाषेबद्दल विखारी वक्तव्ये केले होते. यावरुन त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. काही राजकीय पक्षांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केली. अखेर त्याने माफीही मागितली. त्यात त्याच्या आईनं मुलाची बाजू घेतली तर दुसरीकडे वडिल कुमार सानूने मुलाचे कान टोचले होते.

वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मुलानेही त्यांना परखड भाषेत उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर कुमार सानु, जान सानू या  बाप आणि पोरांमधील वाद चांगलाच रंगला आहे. त्याने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जान सानूने मराठी भाषेवर टीका टिप्पणी केली होती. त्यावरुन गदारोळ झाला होता. त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. दुसरीकडे कुमार सानूने माफी मागितल्यामुळे हे प्रकरण शांत झाले. असे असताना त्यात जानने आपल्या वडिलांवर तोफ डागली आहे.

मुलाच्या दुःखद निधनानंतर कॉमेडियन राजीव निगम म्हणाले, ‘मनिष पॉल शिवाय..’

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, वडिलांनी माझ्या पालन पोषण यावर टीका केली होती. ते चांगले झाले नाही अशी टिप्पणी त्यांनी केली होती. त्यात माझ्या आईला त्यांनी दोष दिला होता. वास्तविक त्यांनी यावर काही न बोलु नये. यासंबंधी प्रश्न विचारण्याचा त्यांना हक्क नाही. 
माझे वडिल असे का करत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही. माझ्याकडून नकळतपणे चूक झाली हे मी मान्य करतो.

हे ही वाचा: दुबईत पहिल्यांदाच 'या' दिवशी रंगणार 'गल्फ सिने फेस्टिवल'    

मराठी भाषेबद्दलचे ते वक्तव्य मी काही जाणीवपूर्वक केलं नव्हतं. आणि जर माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर त्याबाबत वडिलांनी त्यावर व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची गरज नव्हती. तो अधिकार त्यांना नाही. कुठलेही वडिल हे त्यांच्या मुलाविषयी सोशल मीडियावर अशाप्रकारे बोलणार नाहीत. हे मला सांगायचे आहे. 

‘लव्ह आणि जिहाद हातात हात घालून चालणार नाहीत'

मला माझ्या वडिलांच्या विरोधात जायचे नाही. अशा रितीने माझे संगोपन केले गेले आहे. अशा शब्दांत जानने कुमार सानू यांना टोमणा मारला आहे. मात्र त्यांनी केलेल्या विधानावर बोलायचे आहे. त्यांनी माझी कुठलीही जबाबदारी उचलली नाही. त्याचा विचार केला नाही. त्यामुळे याविषयी त्यांनी न बोललेचं बरं.

एका बाजूला त्यांनी माझे संगोपन कशाप्रकारे करण्यात आले यावर एक व्हिडीओ पोस्ट केला. आणि दुसरीकडे माझ्या कामाचे कौतूकही केले. त्यांच्या मनात कदाचित माझ्याविषयी काही गैरसमज आहेत. त्यावर त्यांच्याशी चर्चा करायची आहे. असेही जानने यावेळी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jaan Kumar Sanu on father Kumar Sanu questioning his upbringing