सुकशेसोबतचा प्रायव्हेट फोटो व्हायरल, जॅकलीनने पोस्टद्वारे केली विनंती|Jacqueline-Sukesh latest news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrashekhar-Jacqueline Fernandez

सुकशेसोबतचा प्रायव्हेट फोटो व्हायरल, जॅकलीनने पोस्टद्वारे केली विनंती

200 कोटींच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar) संबंध असल्याच्या कारणावरून चर्चेत आलेली जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. अभिनेत्रीचा सुकेशसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. चित्रात, दोघेही एक जिव्हाळ्याचा क्षण शेअर करताना दिसत आहेत तर जॅकलीनच्या गळ्यावर प्रेमाची खूण आहे.

व्हायरल फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, जॅकलीन फर्नांडिसने एक Instagram पोस्ट शेअर केली आहे ज्यात ती असे म्हणते आहे की तिला 'न्याय' मिळण्याची अपेक्षा आहे. ही पहिलीच वेळ नाही, याआधीही जॅकलिन आणि सुकेशचे अनेक रोमँटिक फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. एका चित्रात सुकेश मिरर सेल्फी घेत असताना अभिनेत्रीच्या गालावर किस्स करताना दिसला होता.

Jacqueline Fernandez

Jacqueline Fernandez

200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील सुकेश हा प्रमुख संशयित आरोपी आहे आणि जॅकलीनची अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) या प्रकरणाच्या संदर्भात अनेकदा चौकशी केली आहे. यापूर्वी जॅकलिन फर्नांडिसने त्याच्यासोबत डेटिंगच्या अफवांचे खंडन केले आहे. मात्र, सुकेशने दावा केला की तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता आणि त्याच्या वैयक्तिक संबंधांचा गुन्हेगारी खटल्याशी काहीही संबंध नाही.

चंद्रशेखर यांनी अभिनेत्रीला अनेक लक्झरी भेटवस्तू देखील दिल्या ज्यात जिम वेअरसाठी गुच्ची आउटफिट्स (Gucci outfits),गुच्ची शूज, रोलेक्स घड्याळ (Rolex watch), 15 जोड्या कानातले, 5 बर्किन बॅग (Birkin bags), हर्मीस बांगड्या (Hermes bangles) आणि एल.व्ही बॅग (LV bags) यांचा समावेश होता. त्याने जॅकलिनला एक मिनी हेलिकॉप्टरही (Mini helicopter) दिले जे तिने परत केले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: 'कटप्पा' साकारणाऱ्या सत्यराज यांना कोरोनाची लागण; रुग्णालयात उपचार सुरु

अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलीनची बहीण गेराल्डिन फर्नांडिस (Geraldine Fernandez)हिलाही त्याने बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपपत्रानुसार त्याने जॅकलिनच्या आईला सुमारे $1,80,000 आणि एक पोर्शे कार देखील दिली.

अभिनेत्री जॅकलीनने मात्र ईडी अधिकार्‍यांसमोर नोंदवलेल्या तिच्या जबाबात म्हटले आहे की तिच्या बहिणीने चंद्रशेखरकडून $1,50,000 चे कर्ज घेतले होते. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या तिच्या भावाच्या खात्यात त्याने सुमारे १५ लाख रुपये ट्रान्सफर केल्याचेही तिने मान्य केले.

जॅकलिनशिवाय अभिनेत्री नोरा फतेहीचेही (Nora Fatehi) नाव या प्रकरणाशी जोडले गेले होते. जॅकलीन आणि नोरा व्यतिरिक्त, सुकेश चंद्रशेखरने श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि हरमन बावेजा (Harman Baweja) यांसारख्या इतर बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचे संबंध देखील उघड केले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top