विदेशवारीसाठी जॅकलिनची कोर्टात धाव; ईडीनं दिला होता दणका Jacqueline Fernandez | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez

विदेशवारीसाठी जॅकलिनची कोर्टात धाव; ईडीनं दिला होता दणका

बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez)जेव्हापासून 'कॉनमॅन' (Conman)सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात आली आहे तेव्हापासून ती कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. तिच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागला आहे. कारण अद्यापही ईडीने(ED) सुकेश चंद्रशेखरच्या केसमधून जॅकलीनला क्लीन चीट दिलेली नाही. यामुळे जॅकलीनवर भारतातून बाहेर जाण्यावर बंदी आणली गेली आहे. याच बंदीला उठवण्यासाठी जॅकलीननं आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली आहे.

हेही वाचा: बॉलीवूड पदार्पणावर शहनाझनं तोडली चुप्पी, उत्तरानं वाढवला गुंता अन् उत्सुकता

जॅकलीननं कामा संदर्भात परदेशी जाण्याची परवानगी मागितली आहे. जॅकलीननं कोर्टाकडून १५ दिवसांची परवानगी मागितली आहे. म्हणजे ती २० किंवा २१ मे ला अबू-धाबी मध्ये होणाऱ्या IIFA अॅवॉर्ड्स मध्ये सहभागी होऊ शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार,कोर्टाकडून तिनं अबू धाबीसोबतच फ्रान्स आणि नेपाळमध्ये जाण्याची परवानगी देखील मागितली आहे. जॅकलीनला परदेशात सिनेमाच्या इव्हेंट संदर्भातील पत्रकार परिषदेला उपस्थित रहायचं आहे. जॅकलीननं कोर्टाकडे परवानगी मागण्यासाठी केलेल्या अर्जात म्हटलं आहे,आयफासाठी १७ ते २२ मे पर्यंत अबूधाबी मध्ये जॅकलीन राहणार आहे. तसंच,जॅकलीन कान्स फेस्टिव्हलमध्येही सहभागी होणार असून, सलमान खानच्या दबंग शो मध्ये देखील परफॉर्मन्स करणार आहे.

हेही वाचा: उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा

त्या अर्जात जॅकलीनच्या वकीलांनी कोर्टाला म्हटलं आहे की, ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये अभिनेत्रीला आरोपी म्हटलेलं नाही. कोणतंही कारण नं सांगता जॅकलीनचा पासपोर्ट जप्त केला आहे. त्यामुळे जॅकलीनचा पासपोर्ट परत करण्यासंदर्भात अपील केलं गेलं आहे. परंतु, जॅकलीनचा पासपोर्ट हा ईडीच्या ताब्यात नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

हेही वाचा: सोनू, तू कितींदा हृदय जिंकशील! सोशल वर्कसाठी १२ कोटींवर सोडलं पाणी

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जॅकलीनला इमिग्रेशन ऑथोरिटीनं मुंबई विमानतळावर देशातून बाहेर जाण्यावर बंदी आणली होती. कारण जॅकलीनच्या विरोधात ईडीनं लूक आऊट सर्क्युलर(LOC) जारी केलं होतं. जॅकलीनने त्या LOC ला रद्द करण्यासाठी कोर्टाकडे मागणी केली होती. म्हटलं जात आहे की जॅकलीनच्या अर्जावर सुनावणीनंतर कोर्टानं ईडीकडून या प्रकरणात स्पष्टिकरण मागितलं आहे. जॅकलीनच्या या अर्जावर कोर्ट ११ मे ला सुनावणी करणार आहे. आता बघायचं,जॅकलीनच्या बाजूने निकाल लागतो की विरोधात.

हेही वाचा: 'शाहरुखच्या मॉलमध्ये रणवीर सिंगचं दुकान'; काय आहे भानगड?

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर च्या २०० करोडच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणामुळे जॅकलीनच्या मागे लागलेल्या अडचणी काही कमी व्हायला तयार नाहीत. काही दिवसांपूर्वी ईडीने जॅकलीन फर्नांडीसच्या तब्बल ७.२७ करोडच्या संपत्तीवर जप्ती आणली होती. जॅकलीनवर आरोप आहे की तिनं कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर कडून करोडोंचे गिफ्ट्स घेतले होते. सुकेशनं लुबाडलेल्या पैशांतून जॅकलीन आणि तिच्या कुटुंबीयांना महागडे गिफ्ट्स दिले होते. ईडीने या संदर्भात अनेकदा जॅकलीनशी विचारपूस केली आहे.

Web Title: Jacqueline Fernandez Seeks Permission To Travel For Iifa 2022 In Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top