'शाहरुखच्या मॉलमध्ये रणवीर सिंगचं दुकान'; काय आहे भानगड? Ranveer Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh ,Shahrukh Khan

'शाहरुखच्या मॉलमध्ये रणवीर सिंगचं दुकान'; काय आहे भानगड?

'जयेशभाई जोरदार'(Jayeshbhai Jordaar) सिनेमामुळे सध्या सगळीकडे रणवीर सिंगची (Ranveer Singh) चर्चा सुरू आहे. नुकतंच त्यानं एका मुलाखतीच्या दरम्यान बॉलीवूडचा किंग शाहरुख खान(Shahrukh Khan) विषयी असं काही वक्तव्य केलंय ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे. अर्थात शाहरुखच्या विरोधात जाऊन रणवीर सिंग नक्कीच तोंड उघडणार नाही. त्यामुळे त्यानं किंग खानची प्रशंसाच केली आहे. रणवीर सिंग भारतीय सिनेमामधील शाहरुख खानच्या योगदानाविषयी भरभरुन बोलला आहे. त्यानं शाहरुखला 'खरा महान माणूस' म्हटलं आहे.

हेही वाचा: सोनू, तू कितींदा हृदय जिंकशील! सोशल वर्कसाठी १२ कोटींवर सोडलं पाणी

रणवीर सिंग म्हणाला,''शाहरुखनं खरंच भारतीय सिनेमात खूप मोठं काम केलं आहे,यात काहीच शंका नाही. तो आज 'बॉलीवूडचा किंग' म्हणून ओळखला जातो यामागे कारण आहे. एकदा शाहरुखच्याच उपस्थितीत मी एक जोक मारला होता. मी कोणातरी एका दुसऱ्याच व्यक्तीला म्हणत होतो कि शाहरुख स्वतः कधी बोलणार नाही,पण त्यांनी एक मॉल बनवला आहे,ज्यामध्ये आम्ही सगळे दुकान चालवत आहोत. आणि हे खरं आहे जे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याने भारतीय सिनेमाला एक योग्य आकार दिला आहे,त्याचं मोठं योगदान इथे आहे. त्यानं अॅवॉर्ड शोज,लाइव्ह शोज,जाहिराती,सिनेमाचं प्रमोशन्स कसे करायचे याचे अनेक दाखले घालून दिले आहेत. तो एक बेंचमार्क आहे,आदर्श माणूस आहे,आणि या सगळ्याचा तो खरा मानकरी आहे''.

हेही वाचा: उर्मिला-आदिनाथ कोठारेत बिनसलं? दोन महत्त्वाच्या कारणांमुळे रंगली चर्चा

त्याच मुलाखती दरम्यान जेव्हा एका व्यक्तीनं शाहरुख एक गॅंगस्टर आहेत असं म्हटलं तेव्हा रणवीर म्हणाला,''हो,तो खरा गॅंगस्टर आहे.बेस्ट गॅंगस्टर.. आणि माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. माझ्या मनात त्याच्यासाठी खूप सम्मान आहे, मी उत्सुक आहे त्याच्या आगामी सिनेमासाठी''. शाहरुखसाठी रणवीर सिंगचं प्रेम अनेक इव्हेंट्समध्ये याआधी देखील पहायला मिळालं आहे.

हेही वाचा: बिकिनीत आयरा तर शर्टलेस आमिर, बर्थे डे पार्टीतील बाप-बेटीचा 'तो' फोटो ट्रोल

रणवीरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर १३ मे ला त्याचा 'जयेशभाई जोरदार' सिनेमा प्रदर्शित होत आहे. सिनेमात शालिनी पांडे ही साऊथची अभिनेत्री त्याच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तर शाहरुखचा'पठाण' सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. 'पठाण' सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम आपल्याला दिसणार आहेत.

Web Title: Ranveer Singh On Shah Rukh Khans Sayshe Has Built This Mall Where We Have Opened Small

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top