Jacqueline Fernandez: श्रीलंकेत घर, बहरीनमध्ये घर, जुहूतही...! जॅकलीनला 'घरघर'| Jacqueline ED investigation house juhu | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jacqueline Fernandez news

Jacqueline Fernandez: श्रीलंकेत घर, बहरीनमध्ये घर, जुहूतही...! जॅकलीनला 'घरघर'

Jacqueline Fernandez: श्रीलंकेतून जॅकलीन भारतात आली ती अभिनेत्री होण्याच्या इराद्यानं. त्यावेळी तिला कुणी गॉडफादर नव्हता. भारतात आल्यावर (Sukesh Chandrashekhar) तिची काही निर्मात्यांशी ओळख झाली. पुढे बॉलीवूडचा भाईजान सलमानशी ओळख झाल्यावर तिच्या वाट्याला काही चित्रपट आले. त्याचे तिनं सोनं केलं. बॉलीवूडमधील काही चित्रपटांमध्ये आयटम साँग कऱणारी (viral news) अभिनेत्री जॅकलीनं आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्यामागे ईडीचा फेरा सुरु झाला आहे. कुणालाही माहिती नव्हतं की, जॅकलीनं ही महाठक सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात आहे. ज्यानं तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. जॅकलीनवर प्रचंड खर्च करणाऱ्या सुकेशमुळेच आता ती अडचणीत सापडली आहे.

ईडीनं जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरनं केलेल्या घोटाळा प्रकरणात आरोपी केलं आहे. आता तिची चौकशी सुरु आहे. यापूर्वी तिचे पासपोर्ट जप्त करण्यात आले होते. त्याचा परिणाम तिच्या चित्रपटाच्या शुटींगवर झाल्याचे दिसून आला. यासगळ्यात जॅकलीननं आपल्यावर खोट्या पद्धतीनं आरोप करण्यात आले असून त्यात खरं काय हे येत्या काही दिवसांत समोर येईल असे सांगितले आहे. ईडीनं केलेल्या चौकशीतून बऱ्याच धक्कादायक घडामोडी समोर आल्या होत्या. त्यात सुकेशनं जॅकलीनला महागड्या वस्तु भेट म्हणून दिल्या होत्या. केवळ जॅकलीनच नाहीतर तिच्या कुटूंबियांना देखील त्यानं त्या वस्तु दिल्या होत्या. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

सुकेशनं जॅकलीनला श्रीलंकेत घर खरेदी करुन दिले होते. बहरीनमध्ये देखील तिचे घर आहे. याशिवाय ती मुंबईतील सर्वाधिक महागड्या भागात जुहूमध्ये अलिशान बंगला खरेदी करणार होती. तिनं तो बूकही केला होता. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीच्या चार्जशीटमधून ही माहिती उघड झाली आहे. त्या माहितीतून असे दिसून आले की, जॅकलीनला सुकेशबाबत सारी माहिती होती. तो काय करतो, त्याच्याकडे किती पैसे आहेत. याविषयी तिला कल्पना होती. सुकेशनं जॅकलीनच्या कुटूंबियांना श्रीलंकेत एक महागडे घर देखील दिले आहे.

हेही वाचा: ऋषीपंचमीचा खगोलशास्त्राशी काय आहे संबंध?

ईडीचे म्हणणे आहे की, सुकेशनं या साऱ्या प्रकरणाविषयी आपली मैत्रिण पिंकी विराणीला सगळं काही सांगितलं आहे. पिंकी ईरानी आणि सुकेशची चांगली मैत्री होती. जॅकलीनसाठी सगळ्या भेटवस्तु पिंकीच सिलेक्ट करत होती. त्यासाठी पिंकीला कोट्यवधी रुपये मिळत होते. सुकेशनं पिंकीशी जॅकलीनला दिलेल्या घरांच्याबाबत देखील महिती दिली होती. त्या श्रीलंकेतील फ्लॅटविषयी सांगितले होते.

हेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड

Web Title: Jacqueline Fernandez Sukesh Chandrashekhar Ed Investigation House In Srilanka Mumbai Juhu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..