esakal | 'गणराया सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य दे'! : तृतीयपंथींसोबत गणेशोत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

'गणराया सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य दे'! : तृतीयपंथींसोबत गणेशोत्सव

'गणराया सर्वांना चांगली बुद्धी, आरोग्य दे'! : तृतीयपंथींसोबत गणेशोत्सव

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये येऊन जॅकलीनला पाचहून अधिक वर्ष झाली. या काळात जॅकलीननं भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्यास सुरुवात केली आहे. ती केवळ एक अभिनेत्री म्हणून नाही तर सामाजिक काम करणारी जबाबदार नागरिक यासाठी देखील ओळखली जाते. सध्या ती तिच्या एका सोशल फाउंडेशनच्या कामात व्यस्त आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा सुरु आहे. लवकरच ती एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या जॅकलीनच्या बाप्पाचा उत्सव व्हायरल झाला आहे. तिनं या उत्सवाच्या निमित्तानं काही सामाजिक उपक्रम राबवले आहेत. जॅकलीन फर्नांडीसने आपल्या योलो फाउंडेशनच्या माध्यमातून समाजात सकारात्मक कार्य करत या गणेशोत्सवात किन्नर ट्रस्टसोबत स्वतःला जोडून घेण्याचा निर्णय घेतला. या बुद्धिदेवतेच्या चरणी लीन होत तिने किन्नर ट्रस्टला भेट दिली.

यावेळी तिनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. तिनं लिहिलं आहे की, सध्या सगळीक़डे भक्तिमय वातावरण आहे. गणरायाच्या गजराचे स्वर कानी पडत आहे. अशा वातावऱणात एकदम प्रसन्न वाटत आहे. अशा उत्सवाचे निमित्त साधून योलो फाउंडेशनच्यावतीनं गणरायाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. हा उत्सव आता किन्नरांसमवेत साजरा करण्यात आला आहे. त्यांनाही त्यात सहभागी करुन घेण्यात आले आहे. बाप्पाचा आशीर्वाद त्यांनाही मिळावा, ही त्यामागील प्रामाणिक भावना असल्याची प्रतिक्रिया जॅकलीननं दिली आहे.

हेही वाचा: Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

हेही वाचा: सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

अभिनेत्रीने आपल्या योलो फाउंडेशनच्या माध्यमातून समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले आहेत. कोरोनाच्या काळात या संस्थेनं अनेक लोकोपयोगी काम केली होती. कोरोनाग्रस्तांना जीवनावश्य़क वस्तूंचे वाटपही त्यांनी केले होते. या पॅंडेमीकमध्ये गरजूंसाठी अन्न दान असेल किंवा भटक्या कुत्र्यांची मदत तसेच, पोलिसांना मास्क, सॅनिटायझर्स इत्यादींचे वाटप करण्यात आघाडीवर होती. या काळात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे हे समाजोपयोगी काम पहात आलो आहोत मात्र जॅकलीन खूप आधीपासूनच हे अथकपणे करत आली आहे. जॅकलिनच्या वर्क फ्रंट बाबत बोलायचे झाल्यास, जॅकलीनकडे सर्कस, बच्चन पांडे, किक 2 आणि रामसेतु यांसारखे बिग बजेट चित्रपट रांगेत आहेत.

loading image
go to top