Janhvi Kapoor: अब्बु मान गये! जान्हवीचं ठरलं, बॉयफ्रेंडसोबत गेली हनीमूनला?

Janhvi Kapoor
Janhvi KapoorEsakal

अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आहे. ती शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यातच अलीकडे ती वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत मुंबई विमानतळावर दिसली. मात्र तेथे तिच्या फॅमिली व्यतिरिक्त शिखरला पाहिल्यानंतर आता वेगळीच चर्चा सुरु आहे.

Janhvi Kapoor
Sonalee Kulkarni: 'आमचं पाच वर्षांच रिलेशन होत पण...', त्यांनतर सोनालीनं कुणालसोबत केलं लग्न.. कोण होता 'तो'

शिखर पहाडिया हाच आहे ज्याच्यासोबत जान्हवी कपूरच्या डेटिंगच्या बातम्या सध्या येत आहेत. काही वर्षांपूर्वी जान्हवी आणि शिखर पहारिया यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली होती.

पापाराझीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये खुशी आणि जान्हवी कपूर एअरपोर्टवर आत जाताना दिसत आहेत. काही मिनिटांनी आधी बोनी कपूर आणि नंतर शिखर पहारिया जातांना दिसत आहे.

यावेळी जान्हवीनेही हसत हसत पापाराझींना पोज दिली आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांनी अजूनही त्यांच्या नात्याची पुष्टी केलेली नाही. पण दोघेही अनेकदा एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करतात तर कधी सोबत दिसतात.

Janhvi Kapoor
अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रच्या घर बॉम्बनं उडवण्याची धमकी! एका फोन कॉल अन् मुंबई पोलिसांचं धाबंच दणाणलं

दरम्यान जान्हवी तिचा वाढदिवस शिखरसोबत साजरा करणार असल्याचं बोललं जात आहे. जान्हवीचा वाढदिवस ६ मार्चला आहे आणि त्याआधी संपूर्ण कुटुंब आणि शिखर पहारिया सुट्टीसाठी निघाले आहेत. बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु असून आथिया आणि कियारानंतर जान्हवीचा नंबर लागल्याच्याही चर्चा सुरु आहेत.

जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं यावर्षी ती 'बावल' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com