Janhvi Kapoor: 'अगं बाई वेड लागलं की काय..', जान्हवी कपूरच्या अजब डान्स स्टेप्स ट्रोलर्सच्या निशाण्यावर

जान्हवी कपूरनं उदयपुरमधील स्टेज परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे,जो डान्स केवळ ट्रोलर्सला नाही तर तिच्या चाहत्यांनाही आवडला नाही.
Janhvi Kapoor
Janhvi KapoorInstagram

Janhvi Kapoor Dance Video: बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. तिनं नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ तसंच रील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत चांगल्या आणि निवडक भूमिका करताना दिसली. ती अनेकदा मजा-मस्तीवाले व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते.

नुकताच जान्हवीनं उदयपुरमध्ये एक स्टेज शो केला,ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. पण यामध्ये जान्हवीला अजब डान्स केल्यामुळे ट्रोलही केलं जात आहे.(Janhvi Kapoor dance performance in udaipur people trolled her badly )

Janhvi Kapoor
Rakhi Sawant च्या भावाचा आदिल खान विरोधात खळबळजनक खुलासा; म्हणाला,'आमच्या आईचं निधन झालं त्याच दिवशी..'

'मिली' अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकताच उदयपुरमध्ये एक डान्स परफॉर्मन्स दिला आहे,ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. जान्हवीला तिच्या डान्स स्टेप्ससाठी खूप ट्रोल केलं गेलं आहे.

डान्स करताना अनेकदा जान्हवीच्या स्टेप्स इंटरनेटवर लोकांच्या टीकेला सामोऱ्या जाताना दिसत आहेत. तसं पाहिलं तर त्या व्हिडीओत जान्हवी कपूर फ्रिंज आणि सेक्विनच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तिनं व्हिडीओत अनोख्या डान्स स्टेप्स दाखवल्या आहेत. या व्हिडीओनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

Janhvi Kapoor
Kapil Sharma चं नवं गाणं Alone चर्चेत..कॉमेडीयननं गाण्यातून सांगितलीय आपल्या ब्रेकअपची कहाणी

एका सोशल मीडियावरील नेटकऱ्यानं तिच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे की, 'क्यूटेस्ट चिक..', तर एकानं लिहिलं आहे की, 'हिला वेड लागलं वाटतं..', आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'अशा हरकती करायला लागलीस आता..'

या कमेंटवरनं एक गोष्ट मात्र लक्षात येतेय की तिच्या चाहत्यांना आणि इतर काही लोकांना जान्हवीचा हा डान्स अजिबात आवडलेला नाही. म्हणूनच अनेकांनी तिच्यावर ट्रोलिंगचा निशाणा साधला आहे.

Janhvi Kapoor
Kajol: 'अचानक एवढी गोरी कशी झालीस?', काजोलच्या 'त्या' खुलाशानं ट्रोलर्सची बोलती बंद..

जान्हवीकडं सध्या सिनेमांची रांग लागली आहे. तिचे बरेच प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. जान्हवी स्पोर्ट्स कॉमेडी 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' मध्ये राजकुमार राव सोबत 'रूही' सिनेमानंतर पुन्हा काम करताना दिसणार आहे.

त्यानंतर आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच जान्हवी वरुण धवनसोबत 'बवाल' या रोमॅंटिक कॉमेडी सिनेमाच्या माध्यमातून काम करताना दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी अफवा होती की जान्हवी लवकरच तामिळ सिनेमात पदार्पण करतेय. पण तिचे वडील निर्माते बोनी कपूर यांनी या अफवेला विरामचिन्ह देत यात तथ्य नाही असं स्पष्टिकरण दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com