Janhvi Kapoor: सलमान - शाहरुखसोबत काम करशील? जान्हवीचं भन्नाट उत्तर!|Janhvi Kapoor answer salman or shah rukh khan work | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Janhvi Kapoor news

Janhvi Kapoor: सलमान - शाहरुखसोबत काम करशील? जान्हवीचं भन्नाट उत्तर!

Janhvi Kapoor Viral News: बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही सध्या चर्चेत आली आहे. तिचा गुड लक जेरी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यानिमित्तानं ती वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत फिरते (Bollywood Actress) आहे. एका मुलाखतीमध्ये तिनं आपल्याला आयतं ताट वाढून आल्यानं काय खावं, कसं खावं हे कळेनासे झाले होते. अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. त्याचे झाले असे की, जान्हवीनं धडक आणि गुंजन (Bollywood News) सक्सेनामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यावर तिनं यासाऱ्याचे श्रेय तिचे वडील बोनी कपूर यांना दिले होते. तिची ती प्रतिक्रिया चर्चेत आली होती.

जान्हवीच्या लूक्स आणि चित्रपटांची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असताना तिला विचारण्यात आलेल्या एका प्रश्नानं मात्र नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुला सलमान, शाहरुख सोबत काम करायला आवडेल का असा प्रश्न जान्हवीला विचारण्यात आला होता. त्यावर तिनं दिलेलं उत्तर मात्र नेटकऱ्यांना भावताना दिसत आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या बऱ्याचशा नवोदित कलाकारांना सलमान, शाहरुख आणि आमीरसोबत काम करण्याची इच्छा असते. सध्याच्या आघाडीच्या कलाकारांनी त्यांच्यासोबत कामही केले आहे. असाच प्रश्न जान्हवीला विचारण्यात आला होता.

शाहरुख, सलमान यांच्यासोबत मला काम करताना थोडंस दडपण आल्यासारखे होईल. याचे कारण आमच्यातील वय. माझे वय 25 तर त्यांनी वयाची 50 ओलांडली आहे. अशावेळी ते सगळं मॅच करुन काम करणे आव्हानात्मक असल्याचे जान्हवीचे म्हणणे आहे. शाहरुख, सलमान हे मोठे अभिनेते आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची अनेक स्टार्सची इच्छा असते. पण मलाच त्यांच्याबरोबर काम करताना वेगळं वाटेल. शाहरुख असो किंवा सलमान यांच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास नेहमीच आनंद वाटेल. असेही जान्हवीनं म्हटलं आहे.

हेही वाचा: Salman Khan : बॉलिवूडच्या भाईला अखेर 'बंदुकी'चं संरक्षण

जान्हवी म्हणते, मला वरुण धवनसोबत काम करण्यास जास्त आनंद वाटेल. याशिवाय रणबीरसोबत देखील. मला आतापर्यत आलिया भट्टनं खूपच इन्स्पायर केलं आहे. तिचं काम, त्याची वेगळी पद्धत हे सारं चक्रावून टाकणारं आहे. असे जान्हवीचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Shahrukh Khan - शत्रुघ्न सिन्हा यांचे किंग खान वर गंभीर आरोप, त्यानं मला नेहमीच...

Web Title: Janhvi Kapoor Answer Salman Or Shah Rukh Khan Work With Good One Jerry Girl Interview Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..