Shahrukh Khan - शत्रुघ्न सिन्हा यांचे किंग खान वर गंभीर आरोप, त्यानं मला नेहमीच...|Bollywood Actor Shatrughan Sinha Angry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actor Shatrughan Sinha Angry On Shahrukh khan

Shahrukh Khan - शत्रुघ्न सिन्हा यांचे किंग खान वर गंभीर आरोप, त्यानं मला नेहमीच...

Shatrughan Sinha On Shah Rukh Khan - बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खान याच्यावर ड्रग्ज घेतल्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. त्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. आता त्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ज्या तपास यंत्रणेनं तो तपास केला त्याच्या (Bollywood News) संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दोषींविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी शाहरुखवर काही (Bollywood Movie) गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही दिवसांपूर्वी देखील सिन्हा यांनी आक्रमक होत शाहरुखला सोशल मीडियावरुन काही प्रश्न विचारले होते. त्यावर नेटकऱ्यांनी देखील शाहरुवर टीका केल्याचे दिसून आले होते.

27 मे रोजी एनसीबीनं आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिल्याचे दिसून (NCB) आले. त्यानंतर सोशल मीडियावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना उधाण आले होते. त्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी (Aryan Khan) शाहरुखवर काही गंभीर आरोपही केले होते. एनसीबीनं कोर्टात जे (Shahrukh Khan) आरोपपत्र सादर केले त्याच्यातून आर्यन खानचे नाव हटवण्यात आले आहे. एकीकडे या निर्णयाचे ज्या उत्साहात स्वागत झाले तेवढ्याच प्रमाणात त्या निर्णयावर सोशल मीडियातून टीकाही झाली. त्यात शत्रुघ्न सिन्हा यांनी किंग (entertainment News) खानवर जे मोठे आरोप केले त्याची चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, शत्रुघ्न सिन्हा हे शाहरुखवर नाराज झाले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, मी शाहरुखची मदत केली आहे. मात्र त्यानं मला एकदाही थँक्यु म्हणण्यासाठी फोन केला नाही. जेव्हा मला शाहरुखच्या मुलाला आर्यनला अटक करण्यात आली आहे असे कळले तेव्हा माणूसकीच्या दृष्टीकोनातून मदत करण्याचा निर्णय घेतला होता. मी त्याला मदतही केली. मात्र त्यानंतर त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही हे मला त्याला आवर्जुन सांगायचे आहे.

हेही वाचा: Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर

यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुखवर नाराजी व्यक्त केली होती. मी केवळ शाहरुखलाच नाही तर आर्यन खानला देखील सपोर्ट केला होता. त्यावेळी जे वातावरण होते त्यात मी कायमच आर्यनच्या बाजुनं होतो. असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले होते.

Web Title: Bollywood Actor Shatrughan Sinha Angry On Shahrukh Khan Aryan Khan Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top