Kangana-Javed Defamation Case: 4 जुलैला कंगना कोर्टात हजर राहिली नाही तर...

जावेद अख्तर मानहानी केस प्रकरणात कंगनानं कोर्टाचा अवमान करीत अनेकदा कोर्टात हजर राहणं टाळलं आहे.
Kangana-Javed Defamation Case
Kangana-Javed Defamation CaseGoogle

बॉलीवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना रनौत(Kangana ranaut) जेव्हापासून तिचा 'धाकड' सिनेमा फ्लॉप झाला आहे तेव्हापासून फारशी टिवटिव करताना दिसलेली नाही. पण असं असलं तरी तिची चर्चा मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सुरुच असते. आता बातमी आहे की कंगना रनौतला जावेद अख्तर(Javed AKhtar) मानहानी केस(Defamation Case) प्रकरणात २७ जूनला कोर्टात हजर रहायचे होते. पण कंगना कोर्टात हजर राहिलीच नाही. ज्यानंतर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी कोर्टाला अपील केलं आहे की अभिनेत्री अनेक वेळा कोर्टात हजर राहिलेली नाही. त्यामुळे तिच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलं जावं. परंतु कंगनाचे वकील रिजवान सिद्धिकी यांनी सांगितलंय की ती ४ जुलैला कोर्टात हजर राहणार आहे. या केसप्रकरणातील सुनावणी ४ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता होणार आहे.(Kangana-Javed Defamation Case)

Kangana-Javed Defamation Case
Alia Bhatt Pregnancy:आलिया आगामी सिनेमांचे शूट थांबवणार? टीमची Update समोर

या केसंसंदर्भात थोडक्यात जाणून घ्यायचं तर, २०२० साली कंगना रनौतने जावेद अख्तर यांच्या विरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिनं थेट जावेद अख्तर यांच्या प्रतिष्ठेवरच घाला घातला होता. ज्यानंतर जावेद अख्तर यांनी कोर्टात कंगनाच्या विरोधात मानहानीची केस दाखल केली होती. त्यानंतर त्या केसची सुनावणी अंधेरीच्या मेट्रोपोलिटिन मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरू केली गेली. जावेद अख्तर यांचा दावा होता की २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूत आत्महत्येच्या केस नंतर अभिनेत्रीनं बॉलीवूडच्या एका ग्रुप संदर्भात आक्षेपार्ह भाष्य करताना जावेद अख्तर यांच्यावरही उगाचच ताशेरेओढले होते,जे अर्थहीन होते.

Kangana-Javed Defamation Case
'शमशेरा'त फायटिंग सीन करताना का घाबरला होता संजय दत्त? समोर आलं कारण

त्यानंतर कंगनाने देखील जावेद अख्तर यांच्या विरोधात एक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये अभिनेत्रीनं त्यांच्यावर काही गंभीर आरोप लावले होते. तसंच तिनं मानहानीच्या केसला दुसऱ्या कोर्टात ट्रान्सफर करण्यासाठी देखील अपील केलं होतं. तिचं म्हणणं होतं की या केस संदर्भातील सुनावणीत आपल्या विरोधात कट होतोय,तसंच दंडाधिकारी निष्पक्ष नाहीत असं तिचं म्हणणं होतं. परंतु त्यानंतर कोर्टानं तिची ही याचिकाच रद्दबातल केली. तसं पाहिलं तर मानहानी केसप्रकरणात अनेकदा कंगना कोर्टात गैरहजरच राहिली आहे. कोर्टानं यासाठी अनेकदा तिला फटकारलं देखील आहे.

Kangana-Javed Defamation Case
'कॉनमॅन' प्रकरणात जॅकलिन पुन्हा ईडीसमोर हजर, कसून झाली चौकशी

कंगना रनौतने एका मुलाखतीत म्हटलं होतं,''एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावलं होतं. आणि म्हटलं होतं की,राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबिय खूप मोठे लोक आहेत. जर तु त्यांची माफी मागितली नाहीस तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुला तुरुंगातही डांबायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. आणि तु कुठे तोंड दाखवायच्या लायकीची देखील राहणार नाहीस. आणि या सगळ्यानंतर तुझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल. हे त्यांचे शब्द होते. माझ्यावर ते ओरडले देखील होते. त्यावेळी भीतीनं माझा थरकाप उडाला होता''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com