'शमशेरा'त फायटिंग सीन करताना का घाबरला होता संजय दत्त? समोर आलं कारण

'शमशेरा'च्या ट्रेलरमध्ये संजय दत्त-रणबीर कपूर मधील जबरदस्त Action Scene पाहून प्रेक्षकांनी सिनेमाचं प्रदर्शनाआधीच भरभरुन कौतूक केलं आहे.
Sanjay Dutt reveals about ‘Shamshera’ fight scenes
Sanjay Dutt reveals about ‘Shamshera’ fight scenesGoogle

'शमशेरा'(Shamshera) सिनेमात रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि संजय दत्त(Sanjay Dutt) एकमेकां विरोधात जोरदार लढताना दिसणार आहेत. दोघांमध्ये एकापेक्षा एक खतरनाक अॅक्शन सीन्स आहेत. या सिनेमासंदर्भातील अनुभव सांगताना संजय दत्त म्हणाला कि या सिनेमात त्याच्यासाठी फायटिंग सीन करणं खूप कठीण गेलं. संजय दत्त अॅक्शन सीन दरम्यान रणबीरला मारताना घाबरत होता कारण रणबीर त्याच्यासाठी त्याच्या मुलासारखा आहे. आणि रणबीरच्या मनातही सारखं येत होतं की तो संजय दत्तवर हात कसा उचलू शकतो? यासंदर्भात संवाद साधताचा रणबीर,संजय दत्त आणि दिग्दर्शक करण मल्होत्राचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात ते म्हणताना दिसत आहेत की 'शमशेरा' मधील अॅक्शन सीन शूट करणं सर्वात कठीण गेलं. सगळ्यांसमोर ते कसे शूट करावेत हाच मोठा गहन प्रश्न होता.(Sanjay Dutt reveals about ‘Shamshera’ fight scenes)

Sanjay Dutt reveals about ‘Shamshera’ fight scenes
रहना है तरे दिल में: Remake मध्ये कार्तिक आणि आलिया? आर माधवन स्पष्टच बोलला

'शमशेरा' सिनेमात संजय दत्त शुद्ध सिंग च्या भूमिकेत आहे. जो खूप क्रूर जेलर आहे. तर रणबीर एकदम मस्तमौला माणूस सिनेमात दाखवलाय. दिग्दर्शक करण मल्होत्रा त्या बिहाइंड सीन विषयीच्या व्हिडीओत म्हणतोय की,'' सिनेमातील खलनायक आणि हिरोची लढाई ही प्रेक्षकांना पहायला सगळ्यात जास्त आवडतं. पण आपल्याला संजय-रणबीरमधली हिच लढाई शूट करताना टेन्शन आलं होतं. कारण संजय दत्त स्वतः चिंतेत होता की रणबीरला कुठे लागणार तर नाही ना. संजय दत्त रणबीरला आपल्या मुलासारखं मानतो. तो मध्येच म्हणायचा,अरे मी रणबीरला असं मारेन तर त्याला कुठे लागायला नको''.

Sanjay Dutt reveals about ‘Shamshera’ fight scenes
Alia Bhatt Pregnancy:आलिया आगामी सिनेमांचे शूट थांबवणार? टीमची Update समोर

आता हे फक्त संजय दत्त बाबतीत नव्हतं तर रणबीरही, ''संजय दत्तला कसं मारु यार'' असं म्हणायचा. तो म्हणायचा,''अरे मी ९-१० वर्षाचा असल्यापासून संजय दत्तचं पोस्टर माझ्या कपाटात आहे. मी त्यांचा बायोपिक केलाय. आता फायनली आम्ही कॅमेऱ्यासमोर एकत्र काम करतोय. ते ही यात माझ्याशी ते खूप क्रूर वागतायत. मी आजपर्यंत आयुष्यात इतका मार खाल्लेला नाही''.

Sanjay Dutt reveals about ‘Shamshera’ fight scenes
दाक्षिणात्य सिनेमातील खलनायक एनडी प्रसादची घरात गळफास घेऊन आत्महत्या

संजय दत्तनं देखील म्हटलं की,'' मी रणबीरला तो लहान असल्यापासून ओळखतो. माझ्यासमोर तो लहानाचा मोठा झालाय. त्याच्यासोबत फायटिंग सीन करताना मला म्हणून खूप टेन्शन आलं होतं. कारण मी त्याच्यासाठी माझ्या मनात क्रूरता फीलच करत नव्हतो त्यामुळे सगळा सीन बिघडत होता''. तर रणबीर म्हणाला की,''संजय दत्तचं व्यक्तिमत्त्व असं आहे की त्याला पाहिल्यावर घट्ट मिठी मारावी असंच वाटेल. त्याच्याशी गप्पा माराव्यात असं वाटेल''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com