Alia Bhatt Pregnancy:आलिया आगामी सिनेमांचे शूट थांबवणार? टीमची Update समोर Alia Bhatt | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alia Bhatt

Alia Bhatt Pregnancy:आलिया आगामी सिनेमांचे शूट थांबवणार? टीमची Update समोर

आलिया भट्टने(Alia Bhatt) सोमवारी २७ जून,२०२२ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नेंसीची(Pregnancy) बातमी जाहिर केली. इन्स्टाग्रामवर आलियानं एक फोटो शेअर केला आहे,ज्यात ती हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेली आहे आणि तिच्या शेजारी पाठमोरा रणबीर कपूर बसला आहे. आणि दोघेही समोर असलेल्या अल्ट्रासाऊन्ड मशिनच्या मॉनिटरकडे एकटक पहात आहेत.(Alia Bhatt, Ranbir Kapoor announce pregnancy: What happens now to actress future Projects,Here some exclusive updates)

आलियाने फोटोमधील या स्क्रीनला हार्ट इमोजीनं कव्हर केलं आहे. आणि आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आमचं बाळ,लवकरच येणार आहे. पोस्टमध्ये आलियानं आणखी एक फोटो शेअर केला आहे,ज्यात एका सिंहाचं कुटुंब आहे. या पोस्टनंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच रणबीर-आलियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण याचवेळी चाहत्यांना एक प्रश्न सतावतोय- आलियाच्या आगामी प्रोजेक्ट्सचं कसं होणार? ती सिनेमातून ब्रेक घेणार का? चला आलियाच्या आगामी प्रोजेक्टविषयी थोडं जाणून घेऊया.

हेही वाचा: Alia Bhatt Pregnancy:आलियाला गेले दिवस, आजींना आनंदाचे डोहाळे; म्हणाल्या...

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात आलिया रणवीर सिंग सोबत दिसणार आहे. आलियाच्या होम प्रॉडक्शनचा सिनेमा 'डार्लिंग्ज' देखील या वर्षीच रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत शेफाली शाह,विजय वर्मा,रोशन मॅथ्यू देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक जसमीत के रीनचा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे. ९ सप्टेंबरला आलिया आणि रणबीर कपूर यांचा बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' देखील प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

हेही वाचा: दाक्षिणात्य सिनेमातील खलनायक एनडी प्रसादची घरात गळफास घेऊन आत्महत्या

आलियाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतर,आता तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शेड्युलविषयी तिच्या टीमने सांगितलं आहे की तिनं आपल्या बॉलीवूडच्या प्रोजेक्ट्सचे शूट पूर्ण केले आहे. टीमने असं देखील सांगितलं आहे की काही दिवसांतच ती आपला हॉलीवूड सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन'चे देखील शूट पूर्ण करणार आहे. यानंतर आलियाला आपल्या होम प्रॉडक्शनच्या 'डार्लिंग्ज' सिनेमासंदर्भातील प्रॉडक्शनचं थोडंफार राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे. आलिया यानंतर काही काळासाठी शूटमधून ब्रेक घेईल असं देखील तिच्या टीम कडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: 'भारतीय बलात्कार संस्कृती...' प्राजक्ता माळी हे काय म्हणतेय?

आलिया सध्या आपल्या हॉलीवूड पदार्पणातील 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या शूटिंग निमित्तानं यूके मध्ये आहे. या सिनेमात आलिया गल गडोत आणि जेमी डोर्नन या मोठ्या हॉलीवूड स्टार्ससोबत काम करतेय. 'हार्ट ऑफ स्टोन' शूटसाठी आलिया मे मध्येच यूके ला रवना झाली होती. माहितीनुसार या हॉलीवूड सिनेमाचं शूट ऑगस्टमध्ये संपणार आहे.

हेही वाचा: Alia Bhatt Pregnancy: वडील महेश भट्ट यांची पहिली प्रतिक्रिया...

आलिया काही दिवस आधी कपूर कुटुंबाच्या एका छोट्या फॅमिली गेटटूगेदर मध्ये दिसली होती. रणबीर कपूरच्या आत्याचा मुलगा अरमान जैन आणि निताशा नंदा यांनी त्या गेट टूगेदरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटोमध्ये आलिया सोबत तिची बहिण शाहीन, श्वेता बच्चन,अनिसा मल्होत्रा-जैन आणि रीमा जैन देखील नजरेस पडल्या होत्या.

Web Title: Alia Bhatt Ranbir Kapoor Announce Pregnancy What Happens Now To Actress Future Projectshere Some Exclusive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..