Javed Jaffrey Birthday : मायकल जॅक्सनपासून प्रेरणा घेत बॉलिवूडमध्ये आणला ब्रेक डान्स अन् स्टेजही केलं सोबत शेअर

आज जावेद जाफरीचा 59 वा वाढदिवस
Javed Jaffrey Birthday
Javed Jaffrey Birthdayesakal

Javed Jaffrey Birthday : बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांना वेगळ्या ओळखीची गरज नाही. अभिनय, गायन, डान्स कोरिओग्राफर, व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट आणि जाहिरात निर्माता म्हणून फिल्म इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप उत्तम आणि दर्जेदार काम केलं आहे; बहुदा असे फार कमी लोक असतील ज्यांनी तकल्शिज् कॅसल बघितलं नसेल, त्यात काँटेंस्टंटची फजिती आणि त्यावर जाफरिंची कॉमेंट्री एक वेगळीच पर्वणी म्हणावी लागेल.

Javed Jaffrey Birthday
Javed Jaffrey Birthday: शेवटपर्यंत बापाशी होता ३६ चा आकडा! कारण...

आज (रविवार) जावेद जाफरी आपला 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 4 डिसेंबर 1963 रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. जावेद यांचे खरे नाव सय्यद जावेद अहमद जाफरी आहे. ब्रेक डान्सला बॉलिवूडमध्ये हिट बनवण्याचे श्रेयही त्यांना जात.

Javed Jaffrey Birthday
Poli Ladu Recipe : शिळ्या पोळ्या उरल्या आहेत? मग बनवा खास गुळाचा लाडोबा

बॉलीवूडमध्ये ब्रेक डान्स आणला

जावेद जाफरी यांनीच बॉलीवूडमध्ये ब्रेक डान्स आणला. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या जावेद जाफरी यांनी बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना विविध नृत्यशैलींची जाणीव करून दिली. त्याचा 'बुगी वूगी' हा डान्स रिअॅलिटी शोही खूप गाजला होता. जावेदने 1985 मध्ये आलेल्या मेरी जंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Javed Jaffrey Birthday
Men's Health Tips: सायकलिंगदरम्यान केलेली एक चूक ठरू शकते पुरुषांमध्ये नपुंसकतेचं कारण...

शेवटी मायकल जॅक्सनशी भेट झालीच

जावेदवर डान्स किंग मायकल जॅक्सनचा खूप प्रभाव होता, ते मायकलसारखा डान्स करण्याचा प्रयत्न करत असे आणि शेवटी त्यांनी थेट, मायकल जॅक्सन सोबत स्टेज शेअर केला. 2009 मध्ये न्यूयॉर्कमध्ये जेव्हा बॉलिवूड अवॉर्ड्स आयोजित करण्यात आले होते, तेव्हा मायकेल जॅक्सन त्या रात्री शोमध्ये प्रमुख पाहुणे होते. हा अवॉर्ड शो जावेदने होस्ट केला होता आणि यादरम्यान त्यांना मायकल जॅक्सनला भेटण्याची संधी मिळाली.

Javed Jaffrey Birthday
Break Fast Recipe : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी अन् चटपटीत इडली चाट

वडिलांशी होते थोडे कटू संबंध

जावेदचे वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता जगदीप होते, त्यांचे खरे नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी होते. असे म्हटले जाते की जावेदचे वडील जगदीप यांच्याशी जमले नाही, कारण त्याचे वडील जुगार खेळायचे आणि दारू प्यायचे.

Javed Jaffrey Birthday
Health Tips : डेंग्यूपासून स्वत:चे संरक्षण कसे कराल ?

लग्नाच्या पहिल्याच वर्षी घटस्फोट

जावेद जाफरी यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असते. जावेदने 1989 मध्ये 'हिना' फेम अभिनेत्री जेबा बख्तियारशी लग्न केले, पण अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर जावेदने 1991 मध्ये हबीबा जाफरीशी लग्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com