Javed Jaffrey Birthday: शेवटपर्यंत बापाशी होता ३६ चा आकडा! कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Javed Jaffrey Birthday

Javed Jaffrey Birthday: शेवटपर्यंत बापाशी होता ३६ चा आकडा! कारण...

Javed Jaffrey bollywood Actor Birthday : बॉलीवूडमध्ये आपल्या हटके स्टाईलनं नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून अभिनेता जावेद जाफ्रीचे नाव घ्यावे लागेल. २००० च्या दशकांत त्यानं प्रेक्षकांना जिंकून घेतले ते त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांमुळे. खरंतर तो चर्चेत आला होता त्याच्या बुगी वूगी नावाच्या शोमुळे. हा शो भारतभरात खूपच लोकप्रिय झाला होता.

आज आपण जेवढे काही डान्स रियॅलिटी शो पाहतो आहोत ते सुरु होण्यामागची प्रेरणा जावेद जाफ्रीची आहे. त्यानं ९० च्या दशकांत सुरु केलेल्या त्या डान्स शोने अनेकांना प्रेरित केले होते. त्याची लोकप्रियता मोठी होती. यातूनच भारतातल्या मोठमोठया डान्स रियॅलिटी शो ला सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. आज प्रसिद्ध अभिनेता जावेद जाफ्रीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं त्याच्याविषयीच्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या वेगवेगळया गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

जावेदचे वडील प्रख्यात अभिनेते जगदीप हे त्याच्या विनोदी अभिनयासाठी ओळखले जायचे. जावेदलाही त्याच्या नंतरच्या काळात एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखलं जाऊ लागले. गेल्या काही वर्षांमध्ये त्यानं साकारलेल्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. असं सगळं असलं तरी जावेद आणि त्याचे वडील त्यांच्या नात्यामध्ये सगळे काही आलबेल होते असे नाही. त्या दोघांमधील वादाची नेहमीच चर्चा होत राहिली. ४ डिसेंबर १९६३ मध्ये जन्म झालेल्या जावेद आणि वडील जगदीप यांच्यात टोकाचा वाद शेवटपर्यत होता.

त्याचे झाले असे की, जगदीप हे पूर्णपणे दारुच्या आहारी गेले होते. या गोष्टीचा जावेदला खूप रागही होता. त्यावरुन मायलेकांमध्ये वादही झाला होता. मात्र त्याचा जगदीप यांच्यावर काहीही फरक पडला नाही. त्यांच्यातील नातं हे केवळ औपचारिकता उरली होती. जावेदनं वडिलांना अनेकदा दारु सोडण्यावरुन विनवणी केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. जगदीप हे दारुच्या पूर्णपणे आहारी गेले होते. यामुळे की काय त्यांच्यात फारसं बोलणं होत नसे. जावेदनं कित्येक मोठमोठ्या अभिनेत्यांना मध्यस्थी करुन यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा: Viral Video : हे काय चाललंय? इंडिगो विमान कंपनीवर प्रवासी संतापले; व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

एकीकडे जावेद मोठा स्टार झाला होता. इंटरनॅशनल शो चे होस्टिंग करत होता त्याचवेळी त्याच्या फॅमिलीतील वादही तेवढयाच वेगानं समोर येत होते. मात्र त्यावर जावेदनं मात केली होती. आपल्या कामातून त्यानं चाहत्यांना जिंकून घेतले होते. बॉलीवूडमधील वेगळ्या धाटणीचा अभिनेता, उत्कृष्ट डान्सर म्हणून त्याचे नाव घेतले जाते.