Bigg Boss 16: 'माझ्या ऐका स्टेटमेंटमुळं गेमचं..', जय भानुशालीच्या ट्विटनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात...

बिग बॉस 14 चा स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता जय भानुशाली याने एमसी स्टेनचे वेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले आहे.
jay bhanushali reacted after MC Stan won
jay bhanushali reacted after MC Stan won Esakal

jay bhanushali reacted after MC Stan won: बिग बॉस 16 च्या ग्रॅंड फिनालेमध्ये काल मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार याची जोरदार चर्चा रंगली होती मात्र एमसी स्टॅनने ट्रॉफीवर त्याचं नावं कोरलं आहे. प्रियंका ही या ट्रॉफीची दावेदार होती. तिचं यंदाचा सिझन जिंकणार असं सर्वांनाच वाटलं होतं मात्र तसं झालं नाही. दरम्यान एमसी स्टॅनला जिंकल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. त्यातच आता जय भानुशालीच्या एका ट्विटची चर्चा रंगली आहे.

jay bhanushali reacted after MC Stan won
Bigg Boss 16 Final: एक नारी थी सबपर भारी! प्रियंका चहर चौधरीचं स्वप्न भंगलं..चाहत्यांची निराशा

बिग बॉस 16 चा विनर घोषित झाल्यानंतर बिग बॉस 14 चा स्पर्धक आणि टीव्ही अभिनेता जय भानुशाली याने एमसी स्टेनचे वेगळ्या पद्धतीने अभिनंदन केले आहे. त्याने लिहिले की मला म्हणायचं आहे की माझ्या एका विधाननं पुर्ण प्रथाच बदलली आहे. जय भानुशालीच्या या कमेंटवर यूजर्स आता प्रतिक्रिया देत आहेत.

jay bhanushali reacted after MC Stan won
'बस्ती का हस्ती'! बिग बॉस 16 चे काही खास क्षण..Bigg Boss 16

त्याच झालं असं की, काही दिवसांपूर्वीच एका रिपोर्टरनं जय भानुशालीला प्रश्न केला होता. अर्चना गौतम, शिव ठाकरे, स्टॅन की प्रियंका चाहर कोण असेल बिग बॉस १६ चा विनर? यावर जयनं पटकन म्हटलं की, ''यामधून कलर्स वाहिनीसाठी काम करणारा कोण आहे?'' तेव्हा रिपोर्टर पटकन म्हणाला,''प्रियंका चहर...'',तेव्हा जय म्हणाला,''बस्स..मग तिच यंदाचा सिझन जिंकणार. आणि त्यातनंच जर संधी मिळाली तर नशिबानं शिव ठाकरे जिंकू शकतो''.

jay bhanushali reacted after MC Stan won
Shiv Thakare: 'मी जिंकणार असा विश्वास पण..' हरल्यानंतर शिव ठाकरेची प्रतिक्रिया चर्चेत

शो च्या ग्रॅंड फिनालेत टॉप 5 मध्ये प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे,एम सी स्टॅन,अर्चना गौतम आणि शालिन भनोत होते. अखेर फॅन्सच्या प्रेमामुळे सर्वांवर भारी पडून एम. सी. स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता झाला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com